शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; ८ गावात घुमला पोलीसांच्या बुटाचा खडखडाट...

By appasaheb.patil | Updated: October 18, 2019 12:29 IST

सोलापूर तालुका पोलिसांचा सशस्त्र रूट मार्च; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अलर्ट

ठळक मुद्देमतदानादिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनातनागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी पोलिसांना सहकार्य करून मतदान शांततेत पार पाडावेकायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ३०० लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये़ याशिवाय मतदानादिवशी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी गुरुवारी मोहोळ, शहर उत्तर व अक्कलकोटविधानसभा मतदारसंघातील आठ गावांमध्ये सशस्त्र रूट मार्च काढला.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने गुरुवार १७ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मोहोळ विधानसभा मतदारसंघातील बीबीदारफळ, वडाळा, नान्नज, कारंबा व मार्डी, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील उळे व बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) तर सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील कोंडी अशा एकूण आठ गावांमध्ये सशस्त्र पथसंचलन (रूट मार्च) करण्यात आले. 

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़ या रूट मार्चमध्ये पोलीस निरीक्षक १, सीआयएसएफचे पोलीस अधिकारी २४, पोलीस ठाण्याकडील पोलीस कर्मचारी २४, होमगार्ड ७ यांचा सहभाग होता.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानादिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे़ याबाबतचे परिपूर्ण नियोजन झाले असून, नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी पोलिसांना सहकार्य करून मतदान शांततेत पार पाडावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी केले आहे.

३०० लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ३०० लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे़ याशिवाय ७८ लोकांना तात्पुरत्या स्वरूपात तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकakkalkot-acअक्कलकोटmohol-acमोहोळsolapur-city-north-acसोलापूर शहर उत्तर