शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

सोलापुरातील प्लास्टिक बंदीसाठी आता पोलिसांकडून होणार नाकेबंदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:56 AM

महापालिकेचे पथक पुन्हा टाकणार धाडी; १ मार्चपासून प्रभावी अंमलबजावणी, गुन्हेही नोंदवणार

ठळक मुद्देपहिल्या कारवाई प्लास्टिक आढळून आल्यास पाच हजार रुपये दंडदुसºया वेळी १० हजार रुपये दंड आणि तिसºया वेळी पुन्हा प्लास्टिक आढळून आल्यास २५ हजार रुपये दंड सोलापूर महापालिकेने मागील वर्षी राज्यात प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी केली

सोलापूर : शहरात एक मार्चपासून पुन्हा प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. जिल्हाधिकाºयांनी पोलिसांना नाकेबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका शासकीय विभागाच्या मदतीने दुकानदार, हॉटेल्स, फळ विक्रेते, प्लास्टिक उत्पादक यांच्यावर धाडी टाकणार असल्याची माहिती मनपाचे प्रभारी उपायुक्त अजयसिंह पवार यांनी  दिली. 

राज्याच्या पर्यावरण विभागाने १ मे पर्यंत महाराष्ट्राला प्लास्टिकमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी कृती आराखडा तयार झाला आहे. त्यानुसार १ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत जनजागृतीसह कारवाया होणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर यांनी मंगळवारी कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी बैठक घेतली.

मनपा उपायुक्त पवार म्हणाले, जिल्हाधिकाºयांच्या बैठकीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. शहरात बाहेरून कॅरीबॅग येतात. पोलिसांनी  प्लास्टिक वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत. याशिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळ, मनपाचा अन्न व औषध परवाना विभागाकडून कारखान्यांची तपासणी होईल. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मदतीने जनजागृती होईल. दोन महिन्यातील दैनंदिन कामाचा अहवाल जिल्हाधिकाºयांना पाठविला जाणार आहे.

जानेवारी २०२० अखेर दोन टन प्लास्टिक जप्त - मनपाच्या अन्न व परवाना विभागाचे अधीक्षक श्रीराम कुलकर्णी म्हणाले, सोलापूर महापालिकेने मागील वर्षी राज्यात प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी केली. एकूण १० हजार ९०६ आस्थापनांची तपासणी झाली. २३९ जणांवर दंडात्मक कारवाई झाली. १९ हजार ८४९ किलो प्लास्टिक जप्त केले. १२ लाख ५५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

महापालिकेत आज ७२ अधिकाºयांची बैठक - प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या जुन्या सभागृहात गुरुवारी सायंकाळी बैठक होणार आहे. या बैठकीला प्रदूषण नियंत्रण महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी, मनपा उपायुक्त, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त, औषध निरीक्षक, मनपा आरोग्य अधिकारी, सामाजिक संस्थेचे सदस्य, मनपा विभागीय कार्यालयांचे अधिकारी, अतिक्रमण विभाग प्रमुख, अन्न व परवाना विभागाचे अधीक्षक, मंडई अधीक्षक, पोलीस निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक अशा एकूण ७२ जणांना बोलावण्यात आले आहे. 

अशी होणार कारवाई- पहिल्या कारवाई प्लास्टिक आढळून आल्यास पाच हजार रुपये दंड, दुसºया वेळी १० हजार रुपये दंड आणि तिसºया वेळी पुन्हा प्लास्टिक आढळून आल्यास २५ हजार रुपये दंड आणि आस्थापना मालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली जाणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPlastic banप्लॅस्टिक बंदीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस