09 Jan, 19 01:08 PM
2022 मध्येही मीच सोलापुरातील तीस हजार घरांचे पंतप्रधान म्हणून उद्घाटन करणार - नरेंद्र मोदी
09 Jan, 19 12:53 PM
'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला, सगळ्यांना मकरसंक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा,' - पंतप्रधान नरेंद्र मोदी
09 Jan, 19 12:50 PM
हेलिकॉप्टर घोटाळ्यात ज्या दलालाला परदेशातून आणलं, तो केवळ हेलिकॉप्टरच्या डीलमध्ये सहभागी नव्हता, तर आधीच्या सरकारच्या काळात फ्रान्ससोबत लढाऊ विमानांचा जो सौदा केला जात होता, त्यातही त्याची भूमिका होती - नरेंद्र मोदी
09 Jan, 19 12:40 PM
30 हजार घरांची योजना लवकरात लवकर पूर्ण करणार, विडी कामगार, रिक्षाचालकांचा लाभार्थ्यांमध्ये समावेश - पंतप्रधान मोदी
09 Jan, 19 12:48 PM
भाजपा सरकारकडून सर्वांना समान न्याय देण्याचं काम- पंतप्रधान मोदी
09 Jan, 19 12:45 PM
शहरांच्या स्वच्छतेप्रमाणेच मी सरकारमध्येही स्वच्छता केली आहे - मोदी
09 Jan, 19 12:22 PM
ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन करतो, त्याचं उद्घाटनही आम्हीच करतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी
09 Jan, 19 12:33 PM
09 Jan, 19 12:32 PM
घरांच्या योजनांचं उद्घाटन केलं, घराची चावी सुपूर्द करायला मीच येणार - नरेंद्र मोदी
09 Jan, 19 12:32 PM
राष्ट्रहिताचे मोठमोठे निर्णय घेण्याची गरज, सबका साथ सबका विकास हाच आमचा नारा - नरेंद्र मोदी
09 Jan, 19 12:28 PM
52 हजार किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांवर काम सुरु - पंतप्रधान नरेंद्र मोदी
09 Jan, 19 12:26 PM
09 Jan, 19 12:26 PM
विकासकामांतून स्थानिकांना रोजगाराच्या संधी, भाजपने कधीच दिखाऊपणा केला नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
09 Jan, 19 12:24 PM
विकासकामांतून स्थानिकांना रोजगाराच्या संधी, भाजपने कधीच दिखाऊपणा केला नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
09 Jan, 19 12:18 PM
दलित, आदिवासी, ओबीसी यांच्या आरक्षणातून कोणी काही घेऊ शकत नाही. आम्ही 10 टक्के आरक्षण देऊन सगळ्यांना न्याय दिला आहे - नरेंद्र मोदी
09 Jan, 19 12:16 PM
09 Jan, 19 12:14 PM
आर्थिकदृष्ट्या गरीब मागासांना 10 टक्के आरक्षण देऊन सबका साथ सबका विकासाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे - नरेंद्र मोदी
09 Jan, 19 12:14 PM
10 टक्के आरक्षणातून सवर्ण गरिबांना विकासाची संधी मिळेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी
09 Jan, 19 12:12 PM
सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाला मंजुरी, तुळजाभवानीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना फायदा - नरेंद्र मोदी
09 Jan, 19 12:08 PM
सोलापूरचे ग्रामदैवत श्रीसिद्धेश्वर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि मंगळवेढ्याचे संत दामाजी पंत यांना साष्टांग नमस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात मराठीतून भाषणाला सुरुवात
09 Jan, 19 12:07 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
09 Jan, 19 11:58 AM
09 Jan, 19 11:54 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचं लोकार्पण
09 Jan, 19 11:50 AM
सोलापूर : गरिबांसाठी 30 हजार घरं तयार होत आहेत - मुख्यमंत्री
09 Jan, 19 11:48 AM
याआधी कोणतेही पंतप्रधान तीन वेळा सोलापूरला आले नाहीत - मुख्यमंत्री
09 Jan, 19 11:48 AM
प्रत्येक भेटीत पंतप्रधान मोदी सोलापूरला खूप काही देऊन गेले - मुख्यमंत्री
09 Jan, 19 11:47 AM
संपूर्ण सोलापुरात लवकरच 24 तास पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
09 Jan, 19 11:43 AM
सोलापूर ही कर्मयोगी लोकांची भूमी - मुख्यमंत्री
09 Jan, 19 11:40 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे गरीबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. २०२२ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात येईल, अशा शब्दात माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी पंतप्रधान मोदी यांची स्तुती केली
09 Jan, 19 11:26 AM
30 हजार घरं मजुरांना दिल्याने मोदींचे आभार, 60 वर्षानंतरचं स्वप्न आज साकार होतंय - नरसय्या आडम
09 Jan, 19 11:22 AM
सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सोलापुरात आगमन, मुख्यमंत्री फडणवीसांनी पुणेरी पगडी देऊन केलं मोदींचं स्वागत
09 Jan, 19 11:08 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरमध्ये दाखल
09 Jan, 19 11:06 AM
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर होम मैदानावरील हेलिपॅड येथे दाखल
09 Jan, 19 11:04 AM
09 Jan, 19 11:04 AM