शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

फिर्यादीने केला चोरीचा बनाव; स्थानिक गुन्हे शाखेने दहा तासात चोरट्याला पकडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 22:25 IST

पोलिसांनी अवघ्या १० तासाच्या आत छडा लावून चोरीचा पर्दाफाश केला.

अरुण लिगाडे सांगोला :  घेरडी (ता. सांगोला) येथील श्याम पेट्रोल पंपावरील सुमारे २ लाख १६ हजार रुपये रोकड चोरी प्रकरणाचा सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या १० तासाच्या आत छडा लावून चोरीचा पर्दाफाश केला. फिर्यादी हर्षद गजानन सोनवणे (रा. घेरडी) यानेच चोरीचा बनाव केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी हर्षद सोनवणेला ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्याकडून चोरलेले सुमारे २ लाख १६ हजार रुपये हस्तगत केले आहेत. सदर आरोपीस गुरुवार २३ रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले.

डोक्याला कान टोपी व तोंडाला रुमाल बांधून स्कार्पिओ जीप मधून आलेल्या अज्ञात चौघांनी पेट्रोल पाहिजे असे म्हटले. तसेच यानंतर पंपावरील कामगाराच्या गळ्याला चाकू लावून लाॅकर मधून सुमारे २ लाख १६ हजार रुपयेची रोकड लुटून नेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री  घडली होती. याबाबत , कामगार हर्षद गजानन सोनवणे रा घेरडी यांने पोलिसात चौघाविरुद्ध फिर्याद दिली होती. दरम्यान, घटनेची माहिती व फिर्याद घेऊन सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप पोलीस पथकासह शाम पेट्रोल पंपावर दाखल झाले.

यावेळी पोलिसांच्या पथकाने फिर्यादी हर्षद सोनवणे व कामगार चैतन्य सरगर यांच्याकडे वेगवेगळी सखोल चौकशी केली. यावेळी हर्षद कडे विचारपूस केल्यानंतर तो बुचकळ्यात पडला व त्यानेच प्लॅन करून चोरीचा बनाव केल्याचे कबुली दिली. तर कामगार चैतन्य सरगर यांने सदर कॅश चोरीचा प्रकार घडला नसून तो हर्षदने बनाव केल्याचे सांगितले. पेट्रोल पंपावर चोरलेले सुमारे २ लाख १६ हजार रुपये हर्षद सोनावणे त्याच्या घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत खड्डा खोदून पुरून ठेवले होते व कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याच्यावर गवत टाकले होते. पोलिसांनी पंचा समक्ष सदर रोकड हस्तगत केली आहे. ही कामगिरी सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप पीएसआय शैलेश खेडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर, पोलीस हेडकॉन्स्टेबल नारायण गोलेकर प्रकाश कारटकर, धनाजी गाडे ,अक्षय दळवे, मोहन मनसावाले, अक्षय डोंगरे चालक समीर शेख यांनी केली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर