शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या धडकेतील इसमाची ओळख त्याने घातलेल्या चपलेने पटली

By रूपेश हेळवे | Updated: November 4, 2022 16:37 IST

रुग्णसेवक लादेन याने घटनास्थळी आणलेले चप्पल दाखवल्यानंतर त्यांना मृताची ओळख पटली.

सोलापूर: आसरा पुला जवळ रेल्वे रुळावर शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका इसम छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला. यामुळे त्याची ओळख पटवणे अशक्य झाले होते. दरम्यान, धडकेतील इसमाची ओळख त्यांच्या नातेवाईकांनी घातलेल्या चपलेवरून पटवली. यातगिरी नारायण बासुतकर (वय ५५, रा. दाजी पेठ) असे मयताचे नाव आहे.

बासुतकर हे अक्कलकोट एमआयडीसी मध्ये एका कंपनीमध्ये वॉचमन होते. ते शुक्रवारी सकाळी जुळे सोलापूर येथील नातेवाईकांना भेटण्यास जातो असे सांगून ते जुळे सोलापुरातील कल्याण नगर २ येथे आले. त्यांनी तेथील नातेवाईकांच्या घरी जाऊन त्यांनी भेट दिली. त्यानंतर तेथेच सायकल व मोबाईल ठेवून बाहेर गेले. दरम्यान, काही वेळेने तेथे रुळावर एका इसमाला रेल्वेची धडक बसल्याचे सांगण्यात आले. यामुळे तेथे बघ्यांची मोठी गर्दी झाली.

पोलीसांनी लगेच घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात त्या इसमाचे शरीराचे तुकडे झाले होते. तसेच चेहराही ओळखता येत नव्हते. पोलिसांनी त्या इसमाला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

दरम्यान, संशय आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पहाणी केल्यानंतर ते आपल्याला भेटायला आलेले बासुतकर असल्याचे त्यांना वाटले. यामुळे त्यांनी लगेच बासुतकरांच्या पत्नी व मुलाला संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पत्नी व मुलगा ही रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना ओळख पटेणासे झाले. दरम्यान, रुग्णसेवक लादेन याने घटनास्थळी आणलेले चप्पल दाखवल्यानंतर त्यांना मृताची ओळख पटली, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. ही घटना कळताच मृताच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Solapurसोलापूर