शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सांगोल्यातील १०३ गावांत मतदानाचा टक्का घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 14:00 IST

‘वंचित’मुळे मतविभागणी होण्याचा अंदाज; विकासाऐवजी उणीदुणी काढल्याने मतदारांची होती नाराजी

ठळक मुद्देचालू वर्षी माढा लोकसभा मतदारसंघातून ३१ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेतसांगोला विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर व महाआघाडीचे संजयमामा शिंदे यांच्यातच प्रमुख लढत झाली वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. विजय मोरे यांनाही तालुक्यातून लक्षणीय मते मिळाल्याची चर्चा

अरुण लिगाडे

सांगोला : अत्यंत चुरशीने पार पडलेल्या माढा लोकसभा निवडणुकीतील सांगोला विधानसभा मतदारसंघातील १०३ तर पंढरपूर तालुक्यातील १५ गावांमधून २९६ मतदान केंद्रांवर पार पडलेल्या मतदानात एकूण २ लाख ८९ हजार ४१७ मतदारांपैकी १ लाख ८५ हजार ८१८ मतदारांनी हक्क बजावला. ६४.२0 टक्के मतदान झाले. गतवेळेपेक्षा यंदा कमी मतदान झाल्याने टक्का घसरला आहे.

सन २०१४ च्या तुलनेत हा आकडा अल्पसा घसरला असल्याचेही मतदानाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. गतनिवडणुकीत ६४.५९ टक्के मतदान झाले होते. चालू वर्षी माढा लोकसभा मतदारसंघातून ३१ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. असे असले तरीही सांगोला विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर व महाआघाडीचे संजयमामा शिंदे यांच्यातच प्रमुख लढत झाली आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. विजय मोरे यांनाही तालुक्यातून लक्षणीय मते मिळाल्याची चर्चा आहे.

वंचित आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांचा फटका कुणाला बसतो, यावरच सांगोला तालुक्यातून कुणाला मताधिक्य मिळेल हे निश्चित होईल. वंचित बहुजन आघाडीकडे दलित व मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला आहे. त्याचबरोबर सांगली लोकसभा मतदारसंघातील ‘वंचित’चे उमेदवार व महाराष्ट्रातील धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यामुळे तालुक्यातील काही धनगर मतदारही वंचित आघाडीकडे वळल्याचे समजते. काँग्रेस व राष्ट्रवादीचा हक्काचा मानला जाणारा आंबेडकरी चळवळीतील व मुस्लीम या पारंपरिक मतदारांनी वंचित आघाडीचा पर्याय स्वीकारल्याने माहितीच्या उमेदवाराला त्याचा किती फायदा होणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रमुख उमेदवारांनी विकासाच्या मुद्यावर बोलण्याऐवजी एकमेकांची उणीदुणी काढण्यातच धन्यता मानल्याने काही प्रमाणात तालुक्यातील मतदार नाराज झाला होता. महायुतीचे उमेदवार कर्जबाजारी असल्याचे राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींकडून जाहीर सभेतून सांगितले होते, तर राष्ट्रवादीचे उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे व स्वार्थी असल्याचे महायुतीच्या व्यासपीठावरून बोलले जात होते. प्रचारादरम्यान यंदा सांगोल्याचे पाणी चांगलेच पेटल्याचे दिसून आले. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेवरून महायुतीच्या उमेदवाराने राष्ट्रवादीला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, तर या योजनेला महायुतीच्या उमेदवाराचा विरोध असल्याचा प्रचार सोशल मीडियावरून राष्ट्रवादीने केला होता. 

पाण्याचे आश्वासक भाष्य- सांगोल्यात पार पडलेल्या महायुतीच्या शेवटच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुष्काळी भागातील पाणी प्रश्नावर आश्वासक भाष्य केल्याने तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले होते. त्यामुळे सांगोला तालुक्यातील मतदार आपल्या मतांचे पवित्र दान कोणाच्या पारड्यात टाकले, यावरच माढा लोकसभा मतदारसंघाचा निकाल अवलंबून असेल.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmadha-pcमाढाElectionनिवडणूकVotingमतदान