शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातून विमानसेवा सुरू होण्याचा प्रश्न प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 10:36 IST

सोलापूर विमानसेवेला अडथळा ठरणारी चिमणी हटविण्यास सिध्देश्वर कारखाना तयार, विमानतळ प्राधिकरणाने १५ दिवसात पर्यायी जागा सुचवावी, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे निर्देश

ठळक मुद्देप्राधिकरणाने पुढील १५ दिवसात जागा निश्चित करून द्यावी : जिल्हाधिकारीसोलापुरातून विमानसेवा सुरू होण्याचा प्रश्न प्रलंबितसिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीबाबत जिल्हाधिकाºयांकडे बैठक

सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ विमानसेवेला अडथळा ठरणारी चिमणी हटवून पर्यायी चिमणी उभारण्यास तयार आहे; मात्र पर्यायी चिमणीची जागा विमानतळ विकास प्राधिकरणानेच निश्चित करावी, असे संचालक मंडळाचे म्हणणे आहे. हा विषय आता चर्चेत न ठेवता प्राधिकरणाने पुढील १५ दिवसात जागा निश्चित करून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्राधिकरणाला दिले. 

सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीबाबत जिल्हाधिकाºयांकडे बैठक झाली. कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह विमानतळ विकास प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, सिद्धेश्वर कारखान्याने  विमान प्राधिकरणाला ८ महिन्यांपूर्वी पर्यायी जागा सूचविण्याबाबत पत्र दिले होते.

संदर्भात बैठकाही झाल्या. यानंतर ७ मार्चला विमान प्राधिकरणाने कारखान्याला उत्तर कळविले. प्राधिकरणाच्या वेबसाईटवर यासंदर्भातील निकष दिलेले आहेत. हे निकष तुम्हीच तपासा आणि योग्य त्या ठिकाणी चिमणी उभारा, असे या उत्तरात म्हटले होते. प्राधिकरण स्पष्टपणे यात मदत करीत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांच्यामार्फत प्राधिकरणाकडून चिमणीची नेमकी जागा निश्चित करण्याचे ठरले. जागा निश्चित झाल्यानंतर कारखान्याने कामाला सुरुवात करायची आणि सध्याची चिमणी स्वत:हून हटवायची आहे, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले. 

प्राधिकरणाकडून अपेक्षित प्रतिसादच्सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचा विषय मंत्रालय स्तरावर जाण्याऐवजी यातील संभ्रम दूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी विमानतळ प्राधिकरणाला दिले आहेत. गेल्या काही दिवसात चिमणीच्या प्रश्नावरुन कारखान्याच्या संचालक मंडळाला धारेवर धरण्यात आले होते; मात्र आता कारखान्याच्या संचालक मंडळाने पर्यायी चिमणी उभारण्याची तयारी करीत असताना प्राधिकरणाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  त्यामुळे सोलापुरातून विमानसेवा सुरू होण्याचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयAirportविमानतळ