शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमागधारकांना किमान वेतन द्या, नाही तर कारवाईस सामोरे जा : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 17:16 IST

सोलापूर : यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनप्रश्नी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी किमान वेतन मिळत नसेल ...

ठळक मुद्देसोलापुरातील यंत्रमाग कामगारांना हंगामी मजुरीत ५० टक्के वाढ करण्यात यावी, ही मागणी घेऊन सिटूमार्फत गेल्या दीड वर्षांपासून शासन आणि प्रशासकीय पातळीवर संघर्ष चालू लाल बावटा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारंवार आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाºयांनी दखल घेऊन एक बैठक घेतली

सोलापूर : यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनप्रश्नी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी किमान वेतन मिळत नसेल तर प्रत्येक कारखान्याची पडताळणी करण्यात येईल, किमान वेतन न देणाºया कारखानदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बैठकीत दिला.

सोलापुरातील यंत्रमाग कामगारांना हंगामी मजुरीत ५० टक्के वाढ करण्यात यावी, ही मागणी घेऊन सिटूमार्फत गेल्या दीड वर्षांपासून शासन आणि प्रशासकीय पातळीवर संघर्ष चालू आहे. याविषयी लाल बावटा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारंवार आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाºयांनी दखल घेऊन एक बैठक घेतली. या बैठकीत १०० कार्डास १० ऐवजी १५ पैसे देण्याची सूचना केली, परंतु कारखानदारांशी चर्चा करून भूमिका कळवू, अशी भूमिका यंत्रमागधारक संघाने घेतली. यानंतर बुधवारी पुन्हा बैठक घेण्यात आली. या बैठकीत यंत्रमागधारकांनी एकही रुपया वाढवता येणार नाही, अशी भूमिका घेतली.

जिल्हाधिकाºयांनी यावर नियमानुसार किमान वेतन द्यावे लागेल, असे सांगितले. १२,४४९ एवढे किमान वेतन शासनाने ठरविलेले आहे. तेवढे वेतन कामगारांना मिळते की नाही, याबाबतची पडताळणी करणार असल्याचे सांगितले. पडताळणीत किमानपेक्षा कमी वेतन देणारे कारखानदार आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा या बैठकीत दिला. यानंतर त्यांनी लगेचच सहायक कामगार आयुक्तांंना प्रत्येक कारखान्याची चौकशी करण्याचे आदेश दिले.

या बैठकीस लाल बावटा संघटनेच्या वतीने भूमिका मांडताना नरसय्या आडम म्हणाले, जिल्हाधिकाºयांनी बैठकीतील लवादाच्या निर्णयाप्रमाणे १५ पैशांपेक्षा एक नया पैसा कमी आम्ही मान्य करणार नाही, कामगार कायद्यानुसार किमान वेतनाची अंमलबजावणी करा. नाहीतर प्रत्येक कामगारामार्फत सहा. कामगार आयुक्तांकडे दावा दाखल करण्यात येईल. 

आजपर्यंत सहानुभूतीपूर्वक कामगार आपल्या पाठीशी उभा राहिला, परंतु आताही त्यांना फसवणार असाल तर यंत्रमाग उद्योगाला शासनाच्या सवलती मिळतात, त्या थांबविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आडम यांनी सांगितले. 

ईपीएफनंतर किमान वेतन...-  २ आॅगस्ट २०१७ रोजी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे विभागीय आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांनी अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील हिमालय टेक्स्टाईल या कारखान्यासह सर्व यंत्रमाग कारखानदारांनी कामगारांना ‘ईपीएफ’ लागू करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी कारखानदारांनी याला जोरदार विरोध करून कारखाने बेमुदत बंद ठेवले होते. आता जिल्हाधिकाºयांनी किमान वेतनाच्या मुद्यावर कारखानदारांची तपासणी करून कारवाईचे आदेश दिले असल्यामुळे पुन्हा यंत्रमागधारक, कामगार आणि प्रशासन यांच्यात संघर्ष अटळ आहे.

आज सभा- गुरुवारी सायंकाळी पाच वाजता यंत्रमागधारक संघ कार्यालयासमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत सर्व यंत्रमाग कामगारांना विश्वासात घेऊन बैठकीचा इतिवृत्तांत सांगण्यात येईल व पुढील आंदोलनाची दिशा व कार्यक्रमाची आखणी करण्यात येईल, असे आडम यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयTextile Industryवस्त्रोद्योग