शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील चादरींवर येणार पतंजली ब्रॅण्ड, रामदेव बाबांच्या हालचाली सुरू, यंत्रमागधारकांची सोलापूरात घेणार मार्चमध्ये बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 11:51 IST

योगगुरू रामदेव बाबा आयुर्वेद औषधे व इतर गृहोपयोगी वस्तूंच्या उत्पादनात पतंजलीचा केलेला ब्रॅण्ड आता सोलापुरी चादरींवरही उमटणार आहे.

ठळक मुद्देमार्च महिन्यात योगगुरू रामदेव बाबां सोलापूर दौºयावर सोलापुरी चादर पतंजलीच्या माध्यमातून देशपातळीवर जाणार महिला मेळाव्याअगोदर रामदेव बाबा सोलापुरातील यंत्रमागधारकांची बैठक घेणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : योगगुरू रामदेव बाबा आयुर्वेद औषधे व इतर गृहोपयोगी वस्तूंच्या उत्पादनात पतंजलीचा केलेला ब्रॅण्ड आता सोलापुरी चादरींवरही उमटणार आहे. मार्च महिन्यात सोलापूर दौºयावर येणाºया योगगुरू रामदेव बाबांनी या दृष्टीने तयारी केली आहे. अक्कलकोट येथील विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे १७ ते १९ मार्चदरम्यान योगगुरू रामदेव बाबा यांच्या उपस्थितीत महायोग प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दौºयादरम्यान पंढरपूर येथील महादेव बागल यांनी रामदेव बाबांच्या उपस्थितीत १८ मार्च रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यानंतर पतंजली आॅल इंडिया योग समितीतर्फे याच दिवशी सायंकाळी ५ वा. इंदिरा गांधी पार्क स्टेडियममध्ये रामदेव बाबा, सिनेअभिनेत्री हेमामालिनी, अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला मेळाव्याअगोदर रामदेव बाबा सोलापुरातील यंत्रमागधारकांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत सोलापुरी चादर पतंजलीच्या ब्रॅण्डमध्ये आणण्यासाठी यंत्रमागधारकांचा सहभाग घेण्याबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे सोलापुरी चादर पतंजलीच्या माध्यमातून देशपातळीवर जाणार आहे. १८ मार्च रोजी होणाºया महिला मेळाव्याच्या तयारीसाठी पतंजली महिला समितीच्या राज्य प्रभारी सुधाताई अळ्ळीमोरे, जिल्हा प्रभारी सुजाता शास्त्री, भारत स्वाभिमानीच्या जिल्हा महामंत्री, नगरसेविका संगीता जाधव यांनी महापौर शोभा बनशेट्टी यांची भेट घेतली. मेळाव्याच्या तयारीसाठी पार्क स्टेडियमची पाहणी करून हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व त्या जबाबदाºया उचलण्याचे आश्वासन महापौर बनशेट्टी यांनी दिले. त्याचबरोबर योगगुरू रामदेव बाबा यांना मनपातर्फे मानपत्र देऊन गौरविण्यात यावे, असा प्रस्ताव नगरसेविका संगीता जाधव यांनी सभागृहाकडे दिला आहे. या महिला मेळाव्यास राज्यभरातून सुमारे एक लाख महिला उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. त्यासाठी सिद्धेश्वर देवस्थान कमिटीचे भक्तनिवास मिळावे, यासाठी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. 

टॅग्स :Solapurसोलापूर