शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महापालिका अधिकाºयांच्या आशीर्वादाने ‘अश्विनी’समोर पुन्हा पार्किंग वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:46 IST

सोलापुरातील होतेय नागरिकांची लूट; न्यायालयाने मक्तेदाराच्या विरोधात निकाल दिल्याचेही अधिकाºयांचे म्हणणे

ठळक मुद्देअश्विनी रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या राजीव गांधी इनडोअर स्टेडियमच्या मोकळ्या जागेत पे अँड पार्कमहाराणा प्रताप संघटनेला २०१८ मध्ये मक्ता देण्यात आला होता, मक्तेदाराची एक वर्षाची मुदत आठ महिन्यांपूर्वीच संपली

सोलापूर : महापालिकेतील भूमी व मालमत्ता विभागातील अधिकाºयांच्या आशीर्वादाने अश्विनी सहकारी रुग्णालयासमोरील जागेत पुन्हा पे अँड पार्कच्या नावाखाली वसुली सुरू आहे. मक्तेदाराची मुदत संपली. न्यायालयाने त्याच्याविरोधात निकाल दिल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत. तरीही वसुली सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. 

अश्विनी रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या राजीव गांधी इनडोअर स्टेडियमच्या मोकळ्या जागेत पे अँड पार्कसाठी महाराणा प्रताप संघटनेला २०१८ मध्ये मक्ता देण्यात आला होता. मक्तेदाराची एक वर्षाची मुदत आठ महिन्यांपूर्वीच संपली आहे. या कामात नुकसान झाल्याचा दावा करून मक्तेदाराने दिवाणी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात स्थगिती दिली नाही, मात्र सुनावणी सुरू झाली. यादरम्यानही पार्किंग वसुली सुरू होती. शिवसेनेचे नगरसेवक भारतसिंग बडूरवाले यांनी या प्रकरणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आवाज उठविला. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाºयांनी मक्तेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र दिले.

या पत्राचे पुढे काय झाले याची पडताळणी भूमी व मालमत्ता विभागातील अधिकाºयांनी घेतलेली नाही. अद्यापही पे अँड पार्कच्या नावाखाली वसुली सुरू आहे. मक्तेदाराला राजीव गांधी इनडोअर स्टेडियमच्या जागेवर वसुली करण्याचा मक्ता देण्यात आला आहे. मात्र त्यांनी संरक्षित भिंत फोडून वसुली सुरू केली आहे. विशेष याबद्दल महापालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. 

भूमी व मालमत्ता विभागाच्या प्रमुख सारिका आकुलवार यांना प्रश्न 

  • प्रश्न - अश्विनी रुग्णालयासमोर अद्यापही वसुली का सुरू आहे? 
  • या पे अँड पार्कबद्दल पोलिसांकडे तक्रार दिली होती. प्रकरण न्यायालयात असल्यामुळे वसुली थांबविता आली नाही. चार दिवसांपूर्वी न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला असल्याचे अ‍ॅड. एस. आर. पाटील यांनी सांगितले आहे. त्यांचे पत्र आले की मक्तेदाराला वसुली थांबविण्याचे आदेश देऊ. 
  • प्रश्न - सुनावणी न्यायालयाने वसुली करायला मुभा दिली होती का? 
  • उत्तर - नाही, न्यायालयाने मुभा दिली नव्हती. 
  • प्रश्न - तरीही वसुली का सुरू राहिली. 
  • उत्तर - सुनावणीवेळी न्यायालयाने तसे म्हटले होते. 
  • प्रश्न - न्यायालयाचे लेखी आदेश होते का? 
  • उत्तर - नाही, आदेश नव्हते.

पे अँड पार्कचा विषय भूमी व मालमत्ता विभागाच्या प्रमुख सारिका आकुलवार यांच्याकडेच आहे. त्याची माहिती आम्ही घेतलेली नाही. पण या प्रकरणात नक्की लक्ष घालू. - संदीप कारंजे, नगर अभियंता, महापालिका. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाParkingपार्किंग