शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पांडुरंग...पांडुरंग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 19:47 IST

पंढरपुरातील कार्तिक एकादशी विशेष...

असा पांडुरंग जर प्रत्येकाच्या मदतीला धावून आला तर कुणालाही कुणापुढे मदतीसाठी हात पसरायची वेळ येणार नाही.. सकाळी नऊची वेळ राधिका घरातील कामे पटापट उरकून धावपळ करत एकदाचं आॅफिस गाठायच्या प्रयत्नात तिची तयारी सुरू होती. घड्याळातील काटे पुढे-पुढे जात असताना आपण आॅफिसला वेळेत पोहोचतो की नाही, याच विचारात तिने गाडी काढली आणि निघाली. अर्थात गाडी ही नेहमीप्रमाणे वेगातच होती, हळूहळू एक-एक चौक पार करत गाडी मोदीच्या रस्त्याला लागली आणि नेमकी तिथेच ती बंद पडली. पाहिलं गाडीतलं पेट्रोल ड्राय झालं होतं. ‘ताई काय झालं’ मागून आवाज आला! ती पाहते तर काय, मध्यम बांध्याचा सडसडीत कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावलेला, तो अपरिचित होता पण आवाजात आपुलकीची भावना होती. ती म्हणाली काही नाही, पेट्रोल संपले वाटतं. तो जवळ आला, म्हणाला दाखवा गाडी..

तिने आपल्याच तंद्रीत त्याच्याकडे गाडी कधी सुपूर्द केली. आणि म्हणाला थांबा इथेच, लगेच त्याने कुणाला तरी फोन केला. थोड्या वेळाने तेथे एका बाईकवर माणूस रिकामी बाटली घेऊन आला.. तो गृहस्थ त्याच्या गाडीवर बसला, म्हणाला ‘मी पेट्रोल घेऊन येतो’ तिने बॅगमधून पैसे काढण्यासाठी हात घातला, असू द्या ताई आम्ही आणतो नंतर द्या पैसे, ते लगेच निघून गेले. तेवढ्यात ती माणसं गाडीवरून येताना तिला दिसली. ती जरा सावरून उभे राहिली. हातात लगेच गाडीची चावी घेतली ते जवळ आले. रिकामी बाटली दाखवून म्हणाले.. उद्या संप आहे ना आज ते बाटलीत पेट्रोल देणार नाहीत.

गाडीच न्यावी लागेल पेट्रोल पंपावर. तिने काही बोलायच्या आणि सांगायच्या आधीच त्यांनी हात पुढे केला. तिने काहीच विचार न करता चावी आणि पैसे हातात दिले. तो बाईकवर आलेला माणूस तेथून निघून गेला. अरे हे काय तिच्या डोक्यात नकारात्मक विचारांची घोडदौड सुरू व्हायच्या आधीच तो पार लांब गेलेला होता... ‘हे काय केलंस तू... कशाला चावी दिली त्याला... तू ओळखते का त्याला.. कोण होता तो.. ... या नकारघंटेने तिला आता शुद्धीवर आणले. समाजात घडणाºया, वाचनात येणाºया तर कधी कानावर पडणाºया सर्व गोष्टी डोक्यात घुमू लागल्या. तिने घरी फोन केला. ...कोण होता तो ...कुणाला गाडी दिली. एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली ‘अरे हो,.. पण तो माणूस चांगला होता. आॅफिसमधूनही फोन आला आणि विचारणा झाली वारंवार कुणाला त्रास देणं बरं नाही, या भावनेनं ती नको म्हणाली. आणि आता दहा मिनिटे होऊन गेली होती. तिला काळजी वाटू लागली, यांचं म्हणणं खरं तर ठरणार नाही ना. तो साळसूदपणा दाखवून गाडी घेऊन तर नाही गेला ना..?

खरंतर त्याला नाव तरी विचारायला पाहिजे होतं, तेही नाही. मोबाईल परत खणखणू लागला. घरून फोन येऊ लागला तिने घाबरून काही केल्या फोन उचलला नाही. आता तो ज्या रस्त्याने गेला तिकडे तिची पावलं वळू लागली. त्या पेट्रोल पंपाकडे तिची पावले निघाली. ती आता सर्व देवांना प्रार्थना करू लागली. दोनच महिने झाले होते गाडीला.. तेवढ्यात तो गृहस्थ जवळ आला. मॅडम तुमची गाडी. पेट्रोल भरले आहे, पण उद्या संप असल्याने पंपावर खूप गर्दी होती म्हणून उशीर झाला. तोच बिचारा दिलगिरी व्यक्त करू लागला. ती गाडी बघू लागली गाडीचे सर्व पार्ट आहेत ना..? होय गाडी तर व्यवस्थित होती..! . तिने त्याच्याकडून गाडी घेतली त्याला मदतीबद्दल पैसे देऊ केले, त्याने हात जोडले नको ताई, तुम्ही जा आता, तुम्हाला उशीर होत असेल, तिने त्याला त्याचे नाव विचारले. तो म्हणाला, पांडुरंग मिस्त्री ..पांडुरंग.! .खरंच ... अगदी देवासारखा आला हा गृहस्थ. गजबजलेल्या आणि मोबाईलमध्ये व्यस्त असणाºया उच्चभ्रू समजल्या जाणाºया लोकांना कुठे वेळ असतो. खरंच.. असाच पांडुरंग प्रत्येकाच्या हृदयात वसत असला तर किती छान होईल, असं म्हणत गाडी स्टार्ट करीत ती म्हणाली.. पांडुरंग पांडुरंग...!- ईशा वनेरकर 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारी