शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर देशातील स्वच्छ, सुंदर अन् धार्मिक पर्यटन तीर्थक्षेत्र बनेल; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 16:40 IST

पालखी मार्गाचे भूमिपूजन; मोदीकडून राम कृष्ण हरीचा जयघोष..

पंढरपूर/सोलापूर - पालखी मार्गाच्या कामामुळे पंढरपूरसोबतच परिसरातील इतर जिल्ह्याचा विकास वेगाने होईल. उद्योग, व्यवसायासोबतच धार्मिक पर्यटन वाढेल. पंढरपूरच्या विकासात लोकसहभाग वाढल्यास भविष्यात पंढरपूर देशातील स्वच्छ, सुंदर धार्मिक तीर्थक्षेत्र नक्कीच बनेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पंढरपूरकरांकडून तीन गोष्टी व्यक्त केल्या. मोदी यांनी पंढरपूरकरांना सांगितले की, पालखी मार्गावरील पायी रस्त्याच्या  बाजूला थंड सावली देणारे वृक्ष लावावे, पालखी मार्गावर ठीक ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली जावी अन् भविष्यात पंढरपुरला भारतातील स्वच्छ तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जावे यासाठी काम करावे अशी आशा व्यक्त केली. 

आषाढी वारीसाठी आळंदी व देहूमधून लाखो भाविक पंढरीच्या वाटेवर असतात. हा भक्तीचा सोहळा महाराष्ट्राचे वैभव असून श्रद्धेचा विषय आहे. लाखो भाविक ज्या मार्गावरून चालत येतात, तो रस्ता भव्य व सुंदर असावा या हेतूने नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाचे विस्तारीकरण करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाले आहे. आज या कामाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, व्ही. के. सिंग, राज्यपाल भगतसिंह कोश्यािर, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्र व राज्यातील अन्य मंत्री उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंढरपूरशी जोडण्याच्या उद्देशाने दोन रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन केले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (एनएच-९६५) पाच विभागांच्या चौपदरीकरणासाठी आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या (एनएच-९६५ जी) तीन विभागांच्या चौपदरीकरणाचे त्यांनी भूमिपूजन केले. या राष्ट्रीय महामार्गांच्या दोन्ही बाजूला 'पालखी' साठी समर्पित पदपथ तयार केले जातील, ज्यामुळे भाविकांना त्रासमुक्त आणि सुरक्षित रस्ता मिळेल. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्याशी संबंधित असलेल्या पंढरपूर या यात्रेकरूंचा प्रवास सुकर करण्यासाठी हे प्रकल्प तयार करण्यात आल्याचेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस