शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
2
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
3
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
4
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
5
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
6
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
7
ऑलिंपिकमधील क्रिकेट सामने खेळवण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची घोषणा!
8
“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका
9
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
10
"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
11
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
12
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
13
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
14
'मला कर्करोग आहे, कोणाला सांगायचे नव्हते"; पत्नीला वेदनादायक मृत्यू देऊन पतीने स्वतःला संपवले
15
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
16
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
17
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
18
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
19
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 
20
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला

पंढरीचा वारकरी ; संप्रदायाचे वैभवही मानले जाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 15:02 IST

आनंदानुभूतीसाठी आणि प्रतिक्षणी वर्धमान होणाºया भक्तिसुखाच्या सेवनासाठी तसेच तो भक्तिरस सर्वांना देण्यासाठी सर्व क्षेत्रांतून संतांच्या पालख्या श्रीक्षेत्र पंढरपूरकडे येतात. जगद्कल्याणाची तळमळ घेऊन ही मांदियाळी अविरत आनंदाचा वर्षाव करीत आली आहे, करीत आहे. त्यामुळे हीच खरी वारी आहे. वारी म्हणजे सर्व संतांचे स्नेहमिलन, समष्टीकल्याणाची भगवंताकडे केलेली प्रार्थना आहे, उपासकांनाच नव्हे तर ...

आनंदानुभूतीसाठी आणि प्रतिक्षणी वर्धमान होणाºया भक्तिसुखाच्या सेवनासाठी तसेच तो भक्तिरस सर्वांना देण्यासाठी सर्व क्षेत्रांतून संतांच्या पालख्या श्रीक्षेत्र पंढरपूरकडे येतात. जगद्कल्याणाची तळमळ घेऊन ही मांदियाळी अविरत आनंदाचा वर्षाव करीत आली आहे, करीत आहे. त्यामुळे हीच खरी वारी आहे. वारी म्हणजे सर्व संतांचे स्नेहमिलन, समष्टीकल्याणाची भगवंताकडे केलेली प्रार्थना आहे, उपासकांनाच नव्हे तर उपास्यालाही भावविभोर करणारी सर्व जनसुलभ अशी साधना आहे. वारकरी संप्रदायाचे हे वैशिष्ट्यच आहे की, येथे सर्वांना सर्व मिळण्याची व्यवस्था आहे.

‘यारे यारे लहान-थोर। यातीभलते नारीनर।करावा विचार। न लगे चिंता कोणासी।।’असे उद्गार तुकाराम महाराजांनीच काढले आहे. त्यामुळे जात-पात, धर्म-पंथ वगैरे भेद बाजूला ठेवून सर्व जण येथे येतात. आणि सर्व विसरून एका आनंदामध्ये सुस्नान होत राहतात. हाच अनुभव वारीमध्ये अपेक्षित आहे आणि हेच संप्रदायाचे वैभवही मानले जाते. संत श्रीतुकाराम महाराजांनी हा अनुभव व्यक्त करताना म्हटले आहे,

‘वर्णाभिमान विसरली याति।एकएका लागतील पायी रे।।’म्हणूनच समाजातील सर्व घटक येथे एकोप्याने, समभावाने नांदतात, आनंद घेतात. येथे नामदेव महाराज, नरहरी महाराज, सावता महाराज, गोरोबा काका, रोहिदास महाराज असे विभिन्ना जातींत अवताराला आलेले संत एकत्र येतात. त्यांचे प्रवृत्तीधर्म, कार्य भिन्न असले तरीही येणाºया पारमार्थिक अनुभूतीमध्ये तरतमभाव नाही. सर्वांचा अनुभव एकच आहे आणि समाजकल्याणाची तळमळ सारख्याच तीव्रतेची आहे.-  सुधाकर इंगळे महाराज

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर