शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Pandharpur Wari: कोण मुख्यमंत्री?... आधी टोलचे पैसे द्या; टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याचा वारकऱ्यांशी उद्धटपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 11:26 IST

Pandharpur Wari: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी पंढरपूर आषाढी वारीसाठी येणाऱ्या वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय घेतला, मात्र या निर्णयाचे नाक्यावर पालन केले जात नसल्याचे धक्कादायक वास्तव्य सोलापूर -पुणे महामार्गावरील टोल नाक्यावर दिसून आले.

 - आप्पासाहेब पाटील / यशवंत सादुल

सोलापूर - वेळ सकाळी 8 वाजताची...स्थळ सोलापूर-पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोल नाका.. एकामागून एक गाड्या टोल नाका पास करीत होत्या, एवढ्यात भगवा झेंडा लावून आलेली वारकऱ्यांची जीप टोलनाक्यावर आली..टोल वर येताच जीप मधील वारकऱ्यांनी विठ्ठलाचा जयघोष केला. नाक्यावरील कर्मचाऱ्यांने टोल च्या पैशाची मागणी केली यावेळी त्या गाडीतील वारकऱ्यांनी सांगितलं आम्ही वारकरी आहोत..पंढरपूरला निघालोय मुख्यमंत्र्यांनी टोलमाफी केली आहे टोल घेऊ नका.. यावेळी नाक्यावरील कर्मचाऱ्याने कोण मुख्यमंत्री माहित नाही...ते केबिन मध्ये बसून काहीही सांगतात,  अगोदर पैसे द्या असा सवाल केल्यानंतर संतप्त झालेल्या वारकऱ्यांनी टोलनाक्यावर वाद घातला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी पंढरपूर आषाढी वारीसाठी येणाऱ्या वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय घेतला, मात्र या निर्णयाचे नाक्यावर पालन केले जात नसल्याचे धक्कादायक वास्तव्य सोलापूर -पुणे महामार्गावरील टोल नाक्यावर दिसून आले.

आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे साजरा केला जातो यासाठी आंध्र कर्नाटक व अन्य जिल्ह्यातील हजारो वाहने सोलापूर मार्गे पंढरपूरला जातात. मराठवाड्यातून येणाऱ्या वाहनांना टोल घेतला जात नाही असे एका वाहन चालकाने सांगितले, सोलापुरातील तरीही सोलापूर पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्यावर टोलच्या पैशाची मागणी केली जाते असा आरोप लोहारा तालुक्यातील शरणाप्पा कडबाने, भास्कर पाटील, अमोल गायकवाड, महादेव धारुळे, शिवाजी गायकवाड, पिकू जाधव, लक्ष्मण जगदाळे आदींनी व्यक्त केली.  फास्टटॅग अन् घोळच घोळ...राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या प्रत्येक गाड्यांना फास्टटॅग बंधनकारक केले होते, टोलनाक्यावरील गर्दी कमी करण्यासाठी सर्वच वाहनांच्या समोरील काचेवर फास्टटॅग बसवण्यात आले आहे. टोल माफीचा निर्णय घेण्यात आला असला तरी वारकऱ्यांचे वाहन टोलनाक्यावरून गेल्यावर पैसे कट झाला तर मेसेज व अंधारकांच्या मोबाईलवर येत असल्याचे वाहनधारकाने सांगितले.  निर्णय चांगला पण प्रक्रिया चुकीचीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफीचा निर्णय घेतला तो चांगला आहे मात्र वारकऱ्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी करावी त्यांच्याकडून स्टिकर घ्यावे ते स्टिकर वाहनांना लावल्यास टोल माफी मिळणार असे सांगितल्यामुळे वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी मिळणे थोडे अवघडच आहे, ज्या वाहनांना भगवा झेंडा आहे ज्या वाहनातील लोकांकडे टाळ मृदुंग विना व इतर वारी संदर्भातील साहित्य असेल त्या वाहनांना टोल माफी द्यावी व प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणारी किचकटपुर गेल्या थांबवावी अशी मागणी ह.भ. प. सुधाकर इंगळे महाराज यांनी दिली. 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार