शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप
2
बिल्डरचा प्रतापी बाळ कचाट्यात सापडणार; आज पुन्हा सुनावणी, पोलिसांनी मोठी तयारी केली
3
कपिल सिब्बलांच्या चुकीचा फटका? हेमंत सोरेन यांना धक्का; सुप्रीम कोर्टातील जामीन याचिका मागे!
4
...म्हणून तरी भारत-पाकिस्तानच्या सरकारने एकी दाखवावी; माजी खेळाडूचं रोखठोक मत
5
"आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व," PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक
6
"तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश
7
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
8
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
9
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
10
"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप
11
राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा
12
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
13
"जान्हवी हे नाव म्हणजे ...", 'लेकी'च्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट
14
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
15
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
16
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
17
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
18
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
19
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
20
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना

दुसरा गोल रिंगण सोहळा पार पडला अन् वैष्णवजनांतील उत्साह ओसंडून वाहात राहिला

By appasaheb.patil | Published: June 25, 2023 2:52 PM

मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माउलीच्या नामघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण अकलूज जवळील खुडूस फाटा (ता. माळशिरस) येथे पार पडले.

आप्पासाहेब पाटील

सोलापूर: पालखी सोहळा प्रमुखांनी इशारा करताच रिंगण सुरू झाले. अश्वाच्या धावण्याची गती पाहून वैष्णवजनांतील उत्साह ओसंडून वाहात राहिला. रिंगण सोहळा पार पडताच अवघा आसमंत माउलींच्या नामघोषाने दुमदुमला. यावेळी वारकरी मंडळींनी टाळ-मृदंगाचा गजर करीत अक्षरश: आनंद लुटला.  हे चित्र होते माळशिरस तालुक्यातील खुडूस फाटा येथील. मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माउलीच्या नामघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण अकलूज जवळील खुडूस फाटा (ता. माळशिरस) येथे पार पडले. यावेळी हजारो वारकरी आणि भाविकांनी हा सुखद रिंगण सोहळा डोळ्यांत साठवला आहे.

यावेळी वारकरी मंडळींनी टाळ-मृदंगाचा गजर करीत अक्षरश: आनंद लुटला. स्त्री-पुरुष वारकऱ्यांनी झिम्मा फुगडय़ांचा खेळ मांडला. वारकऱ्यांनी उंचच्या उंच मनोरे उभे करून सर्वाचे लक्ष वेधले. टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर वारकऱ्यांनी फेर धरून उडय़ा मारत, नाचत आपला हा सोहळा अनुभवला आहे.

माळशिरस येथील मुक्काम आटोपून सोमवारी सकाळी माउलींच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे मार्गक्रमण होत असताना वाटेत खुडूस फाटय़ाजवळ दुसरा गोल रिंगण सोहळा पार पडला. सकाळी आठ वाजताच पालखीचे  रिंगणस्थळावर आगमन झाले होते. संपूर्ण मैदानाला प्रदक्षिणा झाल्यानंतर मध्यभागी पालखी विराजमान झाली. नंतर पालखी सोहळा प्रमुखांनी इशारा करताच रिंगण सुरू झाले. अश्वाच्या धावण्याची गती पाहून वैष्णवजनांतील उत्साह ओसंडून वाहात राहिला. रिंगण सोहळा पार पडताच अवघा आसमंत माउलींच्या नामघोषाने दुमदुमला.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी