शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

४५ दिवस बंद राहणार विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन; दिवसातून केवळ ५ तास मिळणार विठ्ठलाचे मुखदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 14:40 IST

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहीनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षते खाली भक्त निवास येथे घेण्यात आली.

सचिन कांबळे -पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिरात विकास कामे सुरू आहेत. या कामा दरम्यान मूर्तीला धोका निर्माण होऊ नये, मूर्ती सुरक्षित राहावी. यासाठी १५ मार्च पासून दीड महिना पदस्पर्श बंद राहणार आहे. तर दिवसभरात फक्त पाच तास विठ्ठलाचे मुख्य दर्शन भाविकांना घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सांगितले.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहीनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षते खाली भक्त निवास येथे घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद,  मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रांत अधिकारी सचिन इथापे, तहसिलदार सचिन लंगुटे, व्यवस्थापक बालाजी पुदलवार, सदस्य संभाजी शिंदे, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख, शकुंतला नडगिरे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाईट फारशी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पुढील तीन महिने विठ्ठलाचे दररोज ५ तास मुखदर्शन सुरू असणार आहे. तसेच विट्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रुफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे. मंदिरातील आणि खास करू विठ्ठलाच्या गर्भगृहातील बदल करण्यासाठी १५ मार्च पासून पुढील काळात हे काम सुरू असणार आहे. साधारण ४५ दिवसाचा जरी कालावधी लागत असला तरी ऐनवेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता ५ जून पर्यंत मंदिराचे सर्व काम पूर्ण होणार आहे.  त्यामुळे आता भाविकांना ३० फुटांवरून मुखदर्शन मिळणार आहे. तर पुढील ४५ दिवस मूर्ती संवर्धनासाठी भाविकांना आता पदस्पर्श दर्शन करता येणार नाही. यामध्ये येणाऱ्या चैत्री यात्रा कालावधीत भाविकांना पूर्ण वेळ मुखदर्शन मिळणार आहे. 

विठ्ठल मूर्ती संरक्षणासाठी आता बुलेटप्रूफ काच -विठ्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रुफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे. काचेचे दोन कवच राहणार असून त्यात एका कावाचामध्ये कॅमेरा राहणार असल्याचे समीतीचे सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहीनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Pandharpurपंढरपूर