शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

जातो माघारी पंढरीनाथा! दुसऱ्या दिवशी निम्मी पंढरी रिकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:39 IST

सारा भार परब्रह्म विठ्ठल-रुक्मिणी यांच्यावर सोडून वारकऱ्यांनी पंढरीचा निरोप घेतला.

- प्रभू पुजारी पंढरपूर : ‘तुझे दर्शन झाले आता।जातो माघारी पंढरीनाथा।।’अशी सावळ्या विठ्ठलास आळवणी करून आषाढी वारी सोहळ्यानिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो वारकºयांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले़ त्यानंतर मंगळवारी सारा भार परब्रह्म विठ्ठल-रुक्मिणी यांच्यावर सोडून पंढरीचा निरोप घेतला. दुसºयाच दिवशी निम्मी पंढरी रिकामी झाल्याचे दिसून आले़सोमवारी रात्रभर राहुट्यांमध्ये भजन, कीर्तन केल्यावर पहाटे चंद्रभागेचे स्नान करून काहींनी पांडुरंगाचे पदस्पर्श, मुखदर्शन, नामदेव पायरी दर्शन घेतले तर काहींनी कळसाचे दर्शन घेऊन पंढरीचा निरोप घेण्यास सुरवात केली. त्यामुळे सकाळपासून शहरातून बाहेर जाण्यासाठी शिवाजी चौक ते स्टेशन रोड, सोलापूर मार्गावरील पुलावर, तीन रस्ता, गोपाळपूर रस्ता, करकंब रस्ता, रेल्वे स्टेशन, चंद्रभागा बसस्थानक आदी ठिकाणी वारकºयांची दाटी झाली होती़आषाढीनिमित्त पंढरीत १५ लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल झाले होते, मात्र दुसºयाच दिवशी त्यातील ५० टक्क्याहून अधिक भाविक दर्शन घेऊन गावाकडे परतले. अजूनही दर्शन रांगेत लाखावर भाविक उभे आहेत़रात्रभर गरजली पंढरीआषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात आलेल्या भाविकांनी मठांमध्ये, राहुट्यांमध्ये भजन-कीर्तन भारूडाचा आनंद घेतला. त्यामुळे पंढरपूर शहरात रात्रीही दूरदूरपर्यंत टाळांचा किणकिणाट, पखवाजाची थाप, हरिनामाचा गजर, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ च्या जयघोषाचा ध्वनी ऐकू येत होता. अनेक हौशी तरुण वारकºयांनी रात्री विविध ठिकाणची गर्दी कमी झाल्यावर वाजत गाजत भजन म्हणत विविध खेळ खेळले आणि वारकरी सांप्रदायाच्या संस्कृतीचा आनंद लुटला.श्री विठ्ठल - रुक्मिणीला वाहिलेले हार सामान्य वारक-यांच्या गळ्यातश्री विठ्ठल-रुक्मिणी श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या चरणावर अर्पण होणारे सर्व हार पदस्पर्श दर्शनासाठी आलेल्या सर्वसामान्य भाविकांच्या गळ्यात घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. यापूर्वी हे हार केवळ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गळ्यातच घातले जात होते. ज्या भाविकांच्या गळ्यात हे हार पडत होते ते प्रसाद म्हणून श्रध्देने घरी नेत असल्याचे दिसत होते.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpurपंढरपूर