शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विशाखापट्टणम येथे नेऊन केला सोलापुरातील पेंटरचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 13:07 IST

सोलापूर शहर पोलीसांनी केली गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ; अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर दोघांविरुद्ध  गुन्हा दाखल

ठळक मुद्देया प्रकरणी सोलापुरात फिर्याद देऊनही खुनाचा गुन्हा दाखल होत नव्हताशेवटी महिबूब याच्या भावाने सोलापूरच्या न्यायालयात धाव घेतलीदिलेल्या फियार्दीवरून संबंधित गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले

सोलापूर : दोन तासांचे काम आहे असे सांगून घरातून घेऊन गेलेल्या इसमाला विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथे नेऊन खून केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खासगी फिर्याद दिल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला. 

कचरुद्दीन बांगेरी (वय ५२, रा. मदर इंडिया झोपडपट्टी चमडा कारखाना शेजारी, कुमठा नाका, सोलापूर), तुषार गोपीचंद कोळी (वय ३०, रा. मुळेगाव तांडा, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. महिबूब सय्यद शेख (वय ३०, रा. भारतरत्न इंदिरानगर, सोलापूर) हा पेंटर कारागीर होता. तो १० मे २०१९ रोजी आपल्या घरात काम करीत होता, तेव्हा दोन्ही आरोपी आले. दोघांनी महिबूब शेख याला अवघ्या दोन तासांचे काम आहे, तामलवाडी येथे जाऊन येऊ असे म्हणाले. महिबूब याची इच्छा नसतानाही दोघांनी बळजबरीने घेऊन गेले. रात्री १0 वाजले तरी महिबूब शेख घरी आला नाही म्हणून आई नसिमा शेख (वय ५८) यांनी कचरोद्दीन बांगेरी याच्या मोबाईलवर फोन करून चौकशी केली. कचरोद्दीन याने आम्ही तिघे आहोत, काळजी करू नका असे सांगितले.

तीन दिवस झाले तरी महिबूब घरी आला नाही, नंतर तुषार कोळी याच्या मोबाईलवरून महिबूब याने घरी फोन केला. ट्रक ड्रायव्हरने मला खूप लांब आणले आहे, मी कोठे आहे मलाच माहीत नाही. हे लोक मला खूप मारहाण करीत आहेत. मला बळजबरीने घेऊन जात आहेत असे म्हणत असताना त्याचा मोबाईल बंद झाला. घरच्यांनी त्याच मोबाईलवर अनेकवेळा फोन केला; मात्र तो बंद लागत होता. १५ मे २0१९ रोजी रात्री २.३0 वाजता शौकत बक्षी याला कचरुद्दीन शेख याने महिबूबचा विशाखापट्टणम येथे मृत्यू झाल्याची माहिती सांगितली. 

घरच्या लोकांनी नक्कापल्ली जि. विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथे धाव घेऊन पाहणी केली असता तेथे महिबूब हा गंभीर जखमी होऊन मरण पावलेल्या अवस्थेत आढळून आला होता. आरोपींनी जबरदस्ती करीत महिबूब याचा मृतदेह सोलापुरात आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. 

या प्रकरणी सोलापुरात फिर्याद देऊनही खुनाचा गुन्हा दाखल होत नव्हता. शेवटी महिबूब याच्या भावाने सोलापूरच्या न्यायालयात धाव घेतली, दिलेल्या फियार्दीवरून संबंधित गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत. 

नक्कापल्ली येथील गार्डने सांगितले सत्य- नक्कापल्ली येथील एका कंपनीच्या आवारात महिबूब शेख याचा मृतदेह पडला होता. महिबूबच्या घरच्यांनी तेथे जाऊन पाहणी केली, संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दिली, मात्र म्हणावी तशी दखल तेथे घेण्यात आली नाही. कंपनीतील एका सिक्युरिटी गार्डने महिबूब शेख याला बेदम मारहाण करून खून केल्याचे सांगितले. यामध्ये कचरुद्दीन बांगेरी व तुषार कोळी हे दोघेही होते अशी माहिती नातेवाईकांना दिली होती. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCourtन्यायालयAndhra Pradeshआंध्र प्रदेश