शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात पद्मश्री मारुती चितमपल्लींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By आप्पासाहेब पाटील | Updated: June 19, 2025 15:53 IST

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास निधन झाले.

- आप्पासाहेब पाटील

सोलापूर : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्यावर शासकीय इतमामात गुरूवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर-तुळजापूर रोडवरील हिंदू लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शोकाकुल वातावरणात अनेकांनी चितमपल्ली यांना श्रध्दांजली अर्पण केली. हवेत बंदुकीच्या फैरी झाडून चितमपल्ली यांना मानवंदना देण्यात आली, त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी बुधवारी सायंकाळीसात वाजण्याच्या सुमारास निधन झाले. प्रकृती खालावल्यामुळे ते काही दिवसांपासून अंथरुणाला खिळले होते. ३० एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री प्रदान करण्यात आले होते. दिल्लीहून परतल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर बुधवारी सोलापुरामधील राहत्या घरी सायंकाळी ७ वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार गोरे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, अधिकारी व राज्यातील पर्यावरणप्रेमींनी चितमपल्ली यांच्याविषयी शोक व्यक्त करीत श्रध्दांजली अर्पित केली.

गुरूवारी सकाळी निघालेल्या चितमपल्ली यांच्या अंत्यसंस्कारावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम, आ. सचिन कल्याणशेट्टी, मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंम्बासे, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूर