शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

२ जूनपासून सुरू होणार पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन

By appasaheb.patil | Updated: May 31, 2024 14:47 IST

दरम्यान, मंदिर संवर्धनाच्या कामामुळे देवाचे पदस्पर्श दर्शन अडीच महिने होते बंद होते. मंदिराचा गाभारा, सोळखांबी आदी भागातील काम पूर्ण झाले आहे.

सोलापूर : पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिर संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून मंदिराचे प्राचीन सौंदर्य खुलू लागले आहे.  येत्या २ जूनपासून श्री विठ्ठल रखुमाईचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार असल्याची माहिती मंदिर समितीने दिली. 

दरम्यान, मंदिर संवर्धनाच्या कामामुळे देवाचे पदस्पर्श दर्शन अडीच महिने होते बंद होते. मंदिराचा गाभारा, सोळखांबी आदी भागातील काम पूर्ण झाले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे. वारकरी भाविकांना संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज काळातील सातशे वर्षांपूर्वीचे मंदिराची रूप पहावयास मिळणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम करताना मूर्तीच्या संरक्षणास कुठल्याही प्रकारची बाधा आलेली नाही. तसेच मूर्ती आणि मंदिराच्या संरक्षणास प्राधान्य देण्यात आले. सदरचे काम पूर्णत्वास आले असून २ जूनपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार आहे. सध्या आषाढी यात्रेच्या निमित्ताने तयारीला वेग आला आहे. यंदाची आषाढी यात्रेत मोठया प्रमाणात वारकरी येतील अशी शक्यता गृहित धरून विविध उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. 

टॅग्स :PandharpurपंढरपूरTempleमंदिर