परतीच्या पावसामुळे आलमट्टी धरण ओव्हरफलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 06:58 PM2017-10-17T18:58:44+5:302017-10-17T19:00:14+5:30

आलमट्टी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या सप्ताहापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच बंगलोर वेधशाळेने पुढील दोन दिवसात पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने ओव्हरफ्लो झालेल्या आलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे मंगळवारी दुपारी अर्धा फूट वर उचलून कृष्णा नदीत ९०१२५ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.

Overflow Reservoirs | परतीच्या पावसामुळे आलमट्टी धरण ओव्हरफलो

परतीच्या पावसामुळे आलमट्टी धरण ओव्हरफलो

Next
ठळक मुद्दे धरण पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला२९० मेगावॅट विजेचे उत्पादन सुरू पावसाचा जोर वाढल्याने कृष्णेची पाणी पातळी खालावली


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर/विजयपूर दि १७ : आलमट्टी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या सप्ताहापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच बंगलोर वेधशाळेने पुढील दोन दिवसात पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने ओव्हरफ्लो झालेल्या आलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे मंगळवारी दुपारी अर्धा फूट वर उचलून कृष्णा नदीत ९०१२५ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.
आलमट्टी धरण पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाचा जोर चार-पाच दिवसांपासून आहे. आलमट्टी धरणात सध्या १२३.०८१ टीएमसी पाणीसाठा आहे.  पुढील दोन दिवस पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज  बंगलोर वेधशाळेने वर्तविल्याने वाढत जाणारी जलपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे अर्धा फूट उचलण्यात आले आहे. त्यातून नदीपात्रात ९०१२५ क्युसेक्स तसेच जलविद्युत पेंद्रासाठी ४५ हजार क्यूसेक पाणी अतिरिक्त सोडण्यात येत आहे. त्यामुळे २९० मेगावॅट विजेचे उत्पादन सुरू झाले आहे. सध्या आलमट्टी धरणात जेवढे पाणी येत आहे. त्याच प्रमाणात धरणातून पाणी बाहेर सोडण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने कृष्णेची पाणी पातळी थोडी खालावली आहे. त्यामुळे धरणात येणारे पाण्याची आवक येथून पुढे कमी होणार आहे. पायथा वीजगृहातून ४५००० क्युसेक्स सोडण्यात येत आहे. धरणाचे दरवाजे उघडून कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्याची ही या महिन्यातील दुसरी वेळ आहे.

Web Title: Overflow Reservoirs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.