शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

दुसºयांचंही ‘घर’ असतं...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 12:29 IST

काही म्हणा, माणसं शिकली हे खरं. प्रत्येकानं शिकायला तर हवंच, पण शिकलं म्हणजे खरंच शहाणपण येतं का हो? पदव्यांच्या ...

काही म्हणा, माणसं शिकली हे खरं. प्रत्येकानं शिकायला तर हवंच, पण शिकलं म्हणजे खरंच शहाणपण येतं का हो? पदव्यांच्या भेंडोळ्यांसोबत शहाणपणाही हवा आहे का नाही? असायलाच हवा ना! अर्थात अनेक जण शिकलेले आणि शहाणेसुरतेही आहेत म्हणा, पण काही साध्या गोष्टीत माणूस एवढा अडाणी कसा राहतो हा प्रश्न तसा कायम अनुत्तरितच राहतो बघा. छोट्या वाटणाºया पण मोठ्या असणाºया फार गोष्टी असतात हो या दुनियादारीत.

मोठ्या मोठ्या हॉटेलात पाळायचा शिष्टाचार कळतो, पण आपल्या किंवा दुसºयांच्या घरात कसे वागावं, हे मात्र कळत नाही राव यांना! हेच बघा ना, काही दिवसांपूर्वी भल्या सकाळीच एक जण माझयाकडे आला. आता एवढ्या सकाळी कुणी आलं म्हणजे काय उगीचंच येणार नाही ना? काहीतरी महत्त्वाचे काम असल्याशिवाय कोण कशाला येईल एवढ्या सकाळी. एकतर मीही भलत्याच घाईत होतो. तो आला, बसला, चहापान झाले; पण मुद्यावर काही येईनाच. दर दहा मिनिटांनी मी त्याला विचारतोय, काय विशेष? त्यावर त्याचे एकच उत्तर, ‘काही नाही.. निवांत. ‘बोलण्यासारखे सगळे विषय संपले, पण हा का आलाय ते काही सांगेना. घरी आलेल्या माणसाला का आलास?’ असंही विचारता येत नाही ना हो। तासाभराने मला थेट विचारावेच लागलं. ‘एवढ्या सकाळी काय काम काढलं?’ आळोखे पिळोखे देत तो म्हणाला, ‘काही नाही हो, निवांत आहे आज नि आपलं टाइमपास म्हणून आलोय!’ आत्ता बोला। 

बरे आपल्या सवयी अन् वेळेप्रमाणेच जगानेही वागावे, असा दुराग्रह कशासाठी हो! प्रत्येकाला आपलं जीवन कसं जगायचं, आपला वेळ कसा घालवायचा याचे स्वातंत्र्य आहे ना. कुणी कधी जेवायला बसावं, कुणी कधी झोप घ्यावी हे दुसºयांनी ठरवायचं का सांगा बरे! परवा असाच माझा एक मित्र घरी आला. बायकोनं सांगितलं, आत्ताच झोपलेत, पहाटेपर्यंत काम करीत बसले होते. उठवलं तर चिडतील, बायकोनं नाही उठवलं म्हणून या पठ्ठ्यानं स्वत:च उठवलं आणि वर म्हणतो कसा, काय झोपमोड झाली नाही ना? आता याच्या पेकाटात लाथ नाही का घालावी? झोपेतून उठवतोय अन् पुन्हा झोपमोड झाली काय म्हणून विचारतोय!

राग आला असला तरी काय? शिवाय काहीतरी महत्त्वाचेच काम असल्याशिवाय असे कोण वागेल! मी त्याला विचारलं तर तो म्हणाला, ‘काही नाही हो, जरा पडावं म्हटलं तर झोपच येईना... म्हटलं चला, तुमच्याशी गप्पा मारत बसावं, हंऽ  हॅऽ!’ तुम्हीच सांगा, याला पायताणानं नाही का हो मारावं?  एक शेजारी तर असा काही भेटला मला, बाप रे! सकाळची घाईगडबड.. आॅफिसला जाण्याची माझी घाई अन् हा शेजारी भल्या सकाळी टपकणारच. ‘पेपर आला का नाही हो अजून?’ असं विचारत दारात पडलेलं वर्तमानपत्र उचलून थेट घरात येणार अन् निवांत वाचत बसणार, रोजचंच हे. फुकटात पेपर वाचायचा अन् वर आमच्याबरोबर चहा नाष्टाही भागायचा त्याचा. सगळं झालं तरी उठायचं नाव नाही घ्यायचा हा. शेवटी एकेदिवशी त्याची जागा दाखवायची पाळी आलीच. दुसºयाच्या घरी कधी जावं, किती वेळ थांबावं, याचा काहीच ताळमेळ कसा नसतो हो यांना? मग काय, यांना ही थुंकण्याचीच जागा वाटते. यांना काही बोलावं तर ते आधीचीच ‘चित्रकला’ दाखवितात. प्रत्येक नमुना वेगळाच हो! काही वाटत नाही यांना. असाच एक नमुना! भर उन्हात आला म्हणून त्याला थंड पाणी दिलं.

एक घोट पिताच तांब्या बाजूला ठेवून म्हणाला, ‘फिल्टरचं पाणी नाही वाटतं.., साधा फिल्टर नाही तुमच्याकडे? कितीही राग आला तरी गिळावा लागतो हो! माझ्या एका मित्राकडे नेहमी येणाºयांचा तर प्रताप काही औरच. घरातला समजून त्याच्यासमोर सगळे बोलायचे. चहापान करायचे. एकदा यालाच चहा करायला घरात साखर नव्हती. बहाद्दरानं गावभर केलं. मित्र विचारायला लागले, ‘एकाएकी एवढी वाईट परिस्थिती कशी आली हो?’ रोज वेगळे नमुने अनुभवायला  मिळतात या दुनियादारीत. तुमच्या घरात तुम्ही कसेही वागा हो, पण इतरांचेही घरपण जपा, दुसºयांचंही ‘घर’ असतं..!   - अशोक गोडगे-कदम(लेखक हे साहित्यिक आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरHomeघर