शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

पोलिस आयुक्तांचे आदेश; गल्लीतील गुंडांची लिस्ट बनवा, एक कॉपी माझ्याकडेही द्या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 12:21 IST

पोलीस आयुक्तांनी दिल्या अधिकाºयांना सुचना : अधिकारी लागले कामाला

ठळक मुद्देशहरातील विविध पोलीस ठाण्यात सावकार विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेतबरेचसे अर्ज नावानिशी तसेच निनावी दाखल करण्यात आले आहेतसर्व पोलीस ठाणे अधिकारी आता सतर्क झाले असून आपल्या हद्दीतील लिस्ट तयार करण्याचे काम करत आहेत

सोलापूर : सावकारी आणि मटका प्रकरणातील अनेक बड्या माश्यांवर कारवाई केल्यानंतर आता पोलीस प्रशासनाचे पाय हे गल्लीतील गुंडांकडे वळाले आहेत. शहरात अशांतता पसरवणारे, गल्ली बोळात गुंडागिरी करत सामान्यांना धमकावत फिरणाºयां विरूध्द पोलीस कडक कारवाई करणार आहेत. गल्लीतील गुंडांची लिस्ट तयार करावी आणि त्याची एक प्रत आयुक्तालयाला देण्याच्या सुचना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीसांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आयुक्तांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास सर्व पोलीस अधिकाºयांनासक्त सुचना दिल्या आहेत़ यात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोटे मोठे गुंड जे तेथील मोठ्या गुंडांनापकडून त्यांच्या नावे गुंडगिरी करतात. तसेच ज्यांच्या नावे गुन्हे दाखल आहेत, सोबतच असे व्यक्ती जे गुंडा गर्दीचे काम करतात पण त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, अशा सर्वांची माहिती गोळा करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत़ यामुळे सर्व पोलीस ठाणे अधिकारी आता सतर्क झाले असून आपल्या हद्दीतील लिस्ट तयार करण्याचे काम करत आहेत.

दरम्यान मंगळवारी सायंकाळी पोलीस आयुक्तालयाच्यावतीने एक व्हिडीओ प्रसारीत करण्यात आला़ यात पोलीस आयुक्त शिंदे म्हणाले, शहरातील विविध पोलीस ठाण्यात सावकार विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर बरेचसे अर्ज नावानिशी तसेच निनावी दाखल करण्यात आले आहेत. या अर्जांचा ही पोलीस प्रशासनाकडून विचार केला जात आहे. अशा तक्रारदारांनी पोलीस ठाण्यात तसेच शहर निबंधक तसेच जिल्हा सावकारी निबंधकाकडे लेखी तक्रार करावी असेही आयुक्त शिंदे यांनी सांगितले.

नागरिकांनी अवैध व्यवसायांची माहिती द्यावीमटका प्रकरणातील कारवाईनंतर अशा प्रकारच्या अवैध व्यावसाय करणाºयांवर तडीपार करावे असे अनेक निवेदन येत आहेत, अशा निवेदनाचा पोलीस प्रशासनाकडून विचार सुरू असून त्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरात अशा कोणत्याही प्रकारचे अवैद्य उद्योग होत असतील तर अशा उद्योगांची माहिती पोलीस प्रशासनाला देण्याचे आहवान पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी