शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पाच शेतकºयांच्या बळकाविलेल्या जमिनी परत करण्याचे सोलापूर जिल्हा उपनिबंधकांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:40 IST

सोलापूर : सावकारीच्या माध्यमातून बळकावलेली शेतजमीन पाच शेतकºयांना परत करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. याशिवाय दावा दाखल झाल्यानंतर ...

ठळक मुद्देसंजय सरडे यांनी सावकारीतून जमीन बळकावल्याचा दावा साबळे यांनी केला होता.सावकारीच्या माध्यमातून ग्रामीण भागात जमीन बळकावण्याचे अनेक प्रकार होतात.सावकारीच्या माध्यमातून बळकावलेली शेतजमीन पाच शेतकºयांना परत करण्याचे आदेश

सोलापूर: सावकारीच्या माध्यमातून बळकावलेली शेतजमीन पाच शेतकºयांना परत करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. याशिवाय दावा दाखल झाल्यानंतर शेतकरी व सावकारांत चार प्रकरणात तडजोड झाली आहे.

सावकारीच्या माध्यमातून ग्रामीण भागात जमीन बळकावण्याचे अनेक प्रकार होतात. यापैकी काहीच शेतकरी सावकारीच्या तक्रारी जिल्हा उपनिबंधकांकडे करतात. मागील काही महिन्यांत यापैकी पाच शेतकºयांना जमीन परत देण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी दिले आहेत. करमाळा तालुक्यातील करंजे येथील शेतकरी सुभाष कृष्णा साबळे यांना सावकाराकडून ७१ आर जमीन परत देण्याचे आदेश झाले आहेत.

संजय सरडे यांनी सावकारीतून जमीन बळकावल्याचा दावा साबळे यांनी केला होता. अनकढाळ(सांगोला) येथील पितांबर विठोबा बंडगर यांना ८१आर जमीन परत मिळाली आहे. बाबासाहेब बंडगर यांच्या विरोधात पितांबर यांनी दावा केला होता. चिंचोली (माढा) येथील भारत वामन लोेंढे यांची ९० आर जमीन अशाच पद्धतीने शिवाजी जाधव यांच्याकडून परत देण्याचे आदेश झाले आहेत. करमाळ्यातील शेलगाव(क) येथील चांगदेव नामदेव माने यांना दोन हेक्टर जमीन परत द्यावी, असे आदेश वैभव कोठारी यांना दिले आहेत.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी येथील नवनाथ विश्वनाथ कापसे यांनी दाव्यात शामसुंदर भुतडा,अशोक लोंढे व इतरांनी सावकारीतून दोन हेक्टर ८५आर जमीन बळकावल्याचे म्हटले होते. जिल्हा उपनिबंधकांनी ही जमीन कापसे यांना द्यावी, असे आदेश काढले आहेत. शिवाजी मारुती रेड्डी यांची ६१ आर जमीन शीतलकुमार जाधव यांनी सावकारीतून बळकावल्याची, एक हेक्टर जमीन बळकावल्याचा रामा गोविंदा शिंदे यांनी त्रिंबक काळे यांच्या विरोधात तर ८० आर जमीन बळकावल्याचा अरुण बब्रुवान गुंडे यांनी प्रतीक ढंगे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. दाव्याची सुनावणी सुरू झाल्यानंतर तडजोडीने दावे मागे घेण्यात आले असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

जिल्हा बँक प्रशासकाचा पदभार होता त्यावेळी सावकारी दाव्याकडे फारसे लक्ष देता आले नाही. सध्या दिलेल्या तारखेप्रमाणे सुनावण्या घेऊन निर्णय दिले जात आहेत. खेड्यापाड्यातून येणाºया शेतकºयांच्या दाव्यांचे निर्णय वेळेवर दिले तर त्यांचा त्रास वाचतो. - अविनाश देशमुख,जिल्हा उपनिबंधक, सोलापूर 

टॅग्स :Solapurसोलापूरagricultureशेती