शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

डोळियांचे डोळे उघडिले जेणें । आनंदाचे लेणें लेवविलें 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 13:10 IST

प्रज्ञाचक्षूंची दर्शनासाठी आस; ३५ वर्षांपासून करताहेत वारी; स्पर्शाने अनुभवले पांडुरंगाचे रूप

ठळक मुद्देआषाढी एकादशी जवळ येईल तशी भक्तांना आस लागली आहे ती पांडुरंग भेटीचीसंतांच्या पालख्या पंढरपूरसमीप येत असताना वैष्णवांचा मेळा मोठ्या प्रमाणावर चंद्रभागा तीरी जमलापांडुरंग कसा आहे असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, विठ्ठल सावळा आहे असे सांगतात

राजकुमार सारोळे पंढरपूर : देवा पांडुरंगा धाव बाबा धाव,आमच्यासाठी नाही बाबा  या पशुपक्ष्यांसाठी, दया कर,असा पाऊस पाड अन्धरणीमातेची तहान भागवहे बोल आहेत जन्माने अंध असलेल्या शोभा व प्रभाकर कांबळे हे दाम्पत्य आणि तिचा भाऊ पंडित गायकवाड यांचे. येळी (ता. उमरगा) येथून पांडुरंग भेटीसाठी आलेल्या या तिघांनी देवाजवळ काय मागणे मांडले पाहा. देवा पांडुरंगा धाव, आमच्यासाठी नव्हे, तहानलेल्या धरणीमातेसाठी, पशुपक्ष्यांसाठी तरी पाऊस पाड. आम्हाला विश्वास आहे, तुला भक्ताची काळजी आहे, एकादशीनंतर तू निश्चित पाऊस पाडशील. 

आषाढी एकादशी जवळ येईल तशी भक्तांना आस लागली आहे ती पांडुरंग भेटीची. संतांच्या पालख्या पंढरपूरसमीप येत असताना वैष्णवांचा मेळा मोठ्या प्रमाणावर चंद्रभागा तीरी जमला आहे. यामध्ये लहान-थोर सर्वांचाच समावेश आहे. या गर्दीत नामदेव पायरीजवळ पांडुरंगाच्या दर्शनासाठी वाट काढत आलेल्या तीन प्रज्ञाचक्षुंकडे लक्ष गेले. एकमेकांचे हात हातात धरून गर्दीतून धक्के खात हे तिघे वाट चालत होते. त्यांच्या चेहºयावर होता आनंद आपण पांडुरंगाच्या समीप आलो याचा. पुढे असणाºया पंडितांनी एका भाविकाला विचारले, ए बाबा नामदेव पायरी कुठे आहे. त्या भाविकाने साद दिली. तुम्ही माऊलीजवळच आला आहात, समोर गर्दी आहे, बाजूला टेका जरा. माऊलीच्या जवळ हा शब्द ऐकल्यावर या तिघांच्या चेहºयावर समाधानाचे हास्य पसरले आणि अंदाज घेत एकमेकाला सावरीत भिंतीला टेका दिला अन् हात जोडले. 

उत्सुकता वाटली म्हणून जवळ जाऊन संवाद साधला.  पांडुरंग कसा आहे असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, विठ्ठल सावळा आहे असे सांगतात. आम्ही स्पर्शाने त्याची अनुभूती घेतली. दिव्यांग रांगेतून आम्हाला थेट दर्शन मिळते. पूर्वी विठ्ठलाच्या मूर्तीला स्पर्श करता येत होते, पण आता पांडुरंग काचेत आहे असे सांगतात. 

पायाला स्पर्श केल्यावर आम्हाला पांडुरंगाच्या दर्शनाचा आनंद मिळतो. एसटीने आम्ही पंढरपुरात आलो, आता पाच दिवस राहून सेवा करतो. पुन्हा गावी जाऊन वर्षभर भजन करून आमची गुजराण होते, अशी कहाणी त्यांनी सांगितली. 

पतीबरोबर वारी..- पंडित गायकवाड हे वयाच्या दहाव्या वर्षांपासून आषाढी वारी करतात. बहीण शोभा हीसुद्धा जन्मापासून अंध. तरीही त्यांनी आपल्या नशिबाला कधी दोष दिला नाही. अशाही अवस्थेत जोडीदार मिळाल्याचा शोभा यांना आनंद. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून पतीबरोबर आषाढी वारी सुरू केली.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी