शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; एकीकडे अंत्यसंस्कार होत असताना दुसरीकडे घरात ‘तिसरा’चा विधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 13:12 IST

तीन दिवस मृतदेह रुग्णालयातच; ‘विद्युतदाहिनी बंद अन् लाकडांची टंचाई’मुळे मृत्यूनंतरही हेळसांड

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : संकटं आली तर एकामागून एक येतात. कोरोनामुळे पतीचा जीव गेला. त्याच्या उपचारासाठी आकाश पाताळ एक केलं अन् दिवस रात्रही. इकडून-तिकडून पैसे आणून पत्नीने बिल भरले. मात्र, नंतर तब्बल तीन दिवस मृतदेह रुग्णालयातच ठेवला गेला. कारण काय तर म्हणे.. विद्युतदाहिनी बंद आहे अन् लाकडांची टंचाई झाली आहे.

पूर्व मंगळवार पेठेतील बोरामणी तालमीजवळ राहणाºया एका ४५ वर्षीय व्यक्तीला ९ जून रोजी खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यात थोडा तापही होताच. मेडिकल दुकानांमधून आणलेल्या गोळ्यांवर त्यांनी किरकोळ समजणारा आजार अंगावर काढला. मात्र, त्रास वाढल्यानंतर त्यांना खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. गांभीर्य ओळखून त्यांना सोलापुरातील एका मोठ्या सहकारी रुग्णालयात हलवले. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी मृत्यू झाला. 

दरम्यान, पत्नीने पतीच्या मृतदेहाची मागणी केली. मात्र रुग्णालयाच्या प्रशासनाने अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रेत देता येत नसल्याचे स्पष्ट केले.  सोमवारी सकाळी या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाच्या प्रशासनाने तातडीने महापालिकेच्या संबंधित विभागाला आणि अधिकाºयांना कळवले. तरीही दोन दिवस मृतदेह रुग्णालयातच पडून होता. परिसरातील नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी महापालिकेच्या प्रशासनास जाब विचारला. तेव्हा कुठे महापालिकेस जाग आली आणि बुधवारी मृत कुटूंबीयाच्या घरी तिसरा विधी सुरु असताना महापालिकेने त्या कोरोनाबाधित रुग्णावर अखेर अंत्यसंस्कार केले. 

पत्नी-मुलांनी टेस्ट स्वत:च करून घेतली !- सोमवारी या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तीन दिवस उलटून गेले तरी मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले नव्हते. अडचणी दूर झाल्यानंतर नियमानुसार परस्पर अंत्यसंस्कार केले गेले. मात्र त्याच्या पत्नीची अन् दोन लहान मुलांची कोरोनाची चाचणी घेण्यासाठी कुणीच आले नाही. अखेर कोणीच न आल्याने मृताच्या पत्नीने आपल्या दोन मुलांना घेऊन मजरेवाडी येथील महापालिकेचा दवाखाना गाठला. तेथेही अनेक प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांना ताटकळत ठेवले गेले. शेवटी तपासणीनंतर ती माता आपल्या मुलासह घरी परतली.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या