शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकाच प्रचार गाडीचा खर्च चारवेळा धरता, आम्हाला तुमचा हिशोब मान्य नाही..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:58 IST

सोलापूर लोकसभेच्या उमेदवारांनी घेतली खर्च नियंत्रण खात्यापुढे भूमिका

ठळक मुद्देसुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराचा खर्च निवडणूक खर्च नियंत्रण विभागाने सुमारे ३५ लाख रुपयांपर्यंत काढलाखर्च तपासणीदरम्यानही उमेदवाराच्या रजिस्टरमधील व निवडणूक खर्च विभागाच्या रजिस्टरमध्ये फरक आढळून आला

सोलापूर : प्रचार करण्यासाठी लावण्यात आलेले वाहन एकाच दिवशी चार तालुक्यांत प्रचार करून परत येते. असे असतानाही त्या चार तालुक्यांत फिरलेल्या एकाच वाहनाचा खर्च निवडणूक यंत्रणेकडून चार वेळा लावण्यात आला आहे़ त्यामुळे तुम्ही आमच्यावर लावलेली खर्चाची रक्कम आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी घेतली आहे.  

सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराचा खर्च निवडणूक खर्च नियंत्रण विभागाने सुमारे ३५ लाख रुपयांपर्यंत काढला आहे. अन्य दोन्ही प्रमुख उमेदवारांचा खर्चही १५ लाखांच्या पुढे रजिस्टरला नोंदविण्यात आला आहे. शुक्रवारी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या खर्च तपासणीदरम्यानही उमेदवाराच्या रजिस्टरमधील व निवडणूक खर्च विभागाच्या रजिस्टरमध्ये फरक आढळून आला. 

प्रचारासाठी लावण्यात आलेला खर्च हा अवास्तव जास्त लावण्यात आल्याची प्रमुख भूमिका सर्वच उमेदवारांनी घेतल्याने निवडणूक खर्च विभागाने याबाबत पुन्हा तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी वाहनांच्या क्रमांकावरून खात्री करून पुन्हा एकदा तपासणी करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती खर्च विभागाचे समन्वय अधिकारी तथा जि.प. मुख्य व लेखा अधिकारी महेश आवताडे यांनी दिली. 

खर्चनिरीक्षकांना उमेदवारांचे उत्तर- काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, भाजपचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर व वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी खर्च कमी दाखविल्याने काही दिवसांपूर्वी खर्चनिरीक्षक यांनी त्यांना नोटीस दिली होती. याबाबत दोन दिवसांत लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तिन्ही उमेदवारांनी लेखी खुलासा दिला असून, काही खर्च मान्य असून, काही खर्च विनाकारण दाखविण्यात आल्याने हा खर्च मान्य नसल्याची भूमिका उमेदवारांनी घेतली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर