सोलापूर : केबल ग्राहकांकडून बिलापोटी वसूल केलेली १ लाख ४६ हजार ४०० रुपये कंपनीला जमा न करता परस्पर वापरल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे़ संतोष शिवाजी गायकवाड, अरुण गायकवाड(रा़ सेटलमेंट) आणि रितेश जाधव या तिघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे़ त्या तिघांना सिद्धी डिजिटलमधून काढून टाकल्यानंतर सुद्धा आठ महिन्यांत सिद्धेश्वरपेठ, लकी चौक, मुरारजीपेठ या परिसरातील केबल ग्राहकांकडून १ लाख ४६ हजार ४०० रुपये वसूल केले़ ही रक्कम कंपनीकडे जमा न करता परस्पर वापरली़ तसेच या ग्राहकांकडील कंपनीचे सेटटॉप बॉक्स काढून टाकून दुसऱ्या कंपनीचे सेटटॉप बॉक्स बसविले़ याबाबत संतोष सुभानराव परबतराव (वय ४५, रा़मिलेनियम स्क्वेअर, रेल्वे लाईन, सोलापूर) यांनी फिर्याद दिली असून, अधिक तपास फौजदार सूर्यवंशी करीत आहेत़
दीड लाखाची फसवणूक
By admin | Updated: July 7, 2014 01:03 IST