शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

रानातला रानमेवा चाखावा एकदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 13:22 IST

आज शेताकडे जायला उशीरच झालं.. कारणही तसंच होतं...कारण आमच्या आप्पाला सोबत घेऊन जायचं होतं..  ‘आज थोडासा वेगळाच विचारत होते ...

ठळक मुद्देमहाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भ विभागात बोरची काटेरी झुडपे आढळतातउमराण, चण्यामण्या बोर, चमेली, चेकनेट, बकुळा बोर, बनारसी बोर, बाणेरी बोर ही झाडं बिनपाण्याचं येतात़

आज शेताकडे जायला उशीरच झालं.. कारणही तसंच होतं...कारण आमच्या आप्पाला सोबत घेऊन जायचं होतं.. ‘आज थोडासा वेगळाच विचारत होते .म्हटलं शेताकडे जाऊन बरेच दिवस झाले होते... आज ‘रानमेवा खायचं’ वाटेत येत असताना बºयाच ... बोरांची झाड होती. ‘पण काहीसं आंबट-गोड होती ... म्हटलं आपल्या शेताकडे बांधावर आहेत. ‘कशाला काळजी करायची ? ‘तितक्यात शेत जवळ आलं.. शेताच्या वस्तीवर गाडी लावली. थेट निघालो (बोर ) अर्थात रानातील रानमेवा हुडकायला़ मग काय गेलो बांधावर असं रांगेने शेत म्हटल्यावर ... बोराची झाडी निश्चित असणारच.

साधारणत: गुराखी पोरांचा त्या झाडांवर डोळा असायचा अन् त्यांनी गुरे चारता चारता झोडपून बोरं खायची, हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क समजला जात असे. शिवाय शाळा चुकवून रानोमाळ हिंडणाºया पोरांनी तरी हा रानमेवा हक्काने खायचाच असे ठरलेले. बायका बोरे झोडपून नेतात. बोरं म्हटल्यावर कोणाला तोंडाला पाणी सोडणार नाही. बोरं खाता खाता लहानपणीची आठवण आली... शाळेत असताना शाळेच्या गेटसमोर.. ‘एक आजीबाई १ रुपयाला एक लहान वाटी द्यायची़ मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यावर मात्र त्या आजीकडे बोरं घेण्यासाठी गर्दी जमत असे, पण आताच्या मुलांना मात्र कुरकुरे, चॉकलेटसाठी आईवडील हौसेनं पैसे देतात़ आता काळ बदललंय. ‘आता ते दिवस राहिले नाहीत, राहिल्या फक्त आठवणी. आजकाल हे काय होतं आहे बºयाच शेतकºयांनी ही झाडं काय कामाची म्हणून ती नष्ट करत आहेत.बोर हे एक लालसर पिवळट रंगाचे आंबटगोड चवीचे फळ. याचा फार मोठा वृक्ष होत नाही. आणि या झाडांना काटे असतात. याच्या बियांना आटोळी म्हणतात.

महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भ विभागात बोरची काटेरी झुडपे आढळतात. उमराण, चण्यामण्या बोर, चमेली, चेकनेट, बकुळा बोर, बनारसी बोर, बाणेरी बोर ही झाडं बिनपाण्याचं येतात़ आम्हीतर खातोच, त्यात पोपट व बुलबुल असे आणखी काही पक्षी आवडीने खातात. विशेष सांगायचं तर बोरांच्या झाडावर छोट्या पिवळ्या, राखाडी चिमण्यांची घरटी दिसून येतात. विहिरीच्या काठावर असणाºया बोरांच्या झाडावर १०-१५ च्या संख्येने सुगरणीची घरटी आढळून येतात. झाडांच्या पानावर कॉमन पिरो, कॉमन सिल्व्हरलाईन फुलपाखराच्या अळ्या आढळून येतात. पक्षी, फुलपाखरांकरिता उपयुक्त असणाºया या झाडांचा आयुर्वेदात चवीला रुचकर, पचण्यास हलके असे बोर मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, वात दोषास कमी करते, जुलाब थांबवते, रक्तविकार, श्रम, शोष वगैरे त्रासातही हितकर असते.बोराचे मूळ, फळ, फुलं औषधे बनविण्याकरिता वापरतात. हे फळ खायला पौष्टिक तर आहेच आणि रानमेवाही होतो. बोराचे झाड शेताच्या बांधावर आपोआप येते. मुद्दाम कोणी बोराचे झाड लावत नाही. कोणी तसे लावल्याचे ऐकिवातही नव्हते. आपल्या बांधावर परंपरेने चालत आलेले एखादे झाड असतेच . आमच्या शेतात तर बºयापैकी बोराची झाडे आहेत. आजही तो विचार केला़ पोटात कावळे ओरडत होते चला तर रानमेवाच खाऊया मस्तपैकी झाडाखाली बसूऩ वेचायला चालू केलं आणि खायला़ मी लहानपणी असताना खिसा भरून खायचो. वरचा खिसा, पँटमधील दोन्ही खिशात गच्च भरलेला असायचं पण आपल्या आवडीच्या खाद्यासाठी थोडासा लहान व्हायला काय हरकत आहे. मस्त एखादं आंबट असायचं आणि दोन-चार गोड असायचे़असेच करता करता बºयापैकी बोरं खाल्ली मन अगदी प्रसन्न झालं. शेताकडची वेचून खाल्लेली बोरं किती गोड लागतात ना! एकदा तुम्ही अनुभवा. - बसवराज बिराजदार(लेखक हे निसर्ग अभ्यासक आहेत़)

टॅग्स :Solapurसोलापूरagricultureशेती