शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर चूल मांडून थापल्या भाकरी; डाळ शिजवत गॅस दरवाढीचा निषेध

By विठ्ठल खेळगी | Updated: March 6, 2023 19:00 IST

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने अकलूज येथे महागाई व गॅस दरवाढीच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले. 

सोलापूर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने अकलूज येथे महागाई व गॅस दरवाढीच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले रस्त्यावर चूल मांडून महिलांनी भाकरी थापल्या व दाळ शिजवत गॅस दरवाढीचा निषेध नोंदविला यावेळी गॅस सिलेंडरला हार घालत अनोखे आंदोलन केले. युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत, युवा सेना उपजिल्हा प्रमुख सोनू  पराडे-पाटील, महिला आघाडी जिल्हा प्रमुख पुनमताई अभंगराव, युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे, उपजिल्हा प्रमुख नामदेव नाना वाघमारे, अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे,  युवा सेना शहर प्रमुख शेखर खिलारे आदी उपस्थित होते. 

यावेळी बस हुई महंगाई की मार, नहीं चाहिये मोदी सरकार.., अब की बार महंगाई की मार.., मोदी सरकार हाय हाय.., गॅस दरवाढीचा निषेध असो.., अशा घोषणा देत आणि लाकडानी पेटवलेल्या चुलीवर भाकरी भाजत  डाळ भात शिजवत  आंदोलन करण्यात आले. युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे म्हणाले की, २०१३ साली घरगुती गॅस चे दर ४१० रुपये होते तेच दर २०२३ रोजी ११५० रुपये झाले. आज राज्य व केंद्र सरकार या दोघांनीही महागाईने सामान्य जनतेचे हाल केले असून पुढील काळात हे आंदोलन अधिक व्यापक केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणत महागाईपासून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न राज्याच्या अधिवेशनात महागाईच्या मुद्द्यावर सरकार काहीच बोलत नाही. महाराष्ट्रावर बोलणाऱ्या इतरांचा सत्कार करायचा आणि खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणायचा असे करून सरकार महागाईपासून जनतेचे लक्ष विचलित करु पाहत आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्किल बनले आहे. जनतेला पुन्हा चुली पेटवाव्या लागणार आहेत. म्हणूनच आज आम्ही चुलीवरील भाकरी भाजून डाळ भात शिजवून आंदोलन छेडत आहोत, असे शिवसेना उपजिल्हा प्रमुख नामदेव वाघमारे म्हणाले.

 

टॅग्स :SolapurसोलापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेInflationमहागाई