शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

अहो आश्चर्यम्; इथे नवरी नव्हे तर नवरदेवच निघाला अल्पवयीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 15:31 IST

बालविवाह रोखला; बार्शी तालुक्यातील घटना

ठळक मुद्देमुलगा आणि मुलगी या दोघांच्या वयाची तपासणी पोलिसांनी केलीमुलाचे वय कायद्यानुसार २१ वर्षे असणे गरजेचे आहे १८ वर्षे़ मुलाचे वय कायद्यानुसार दोन वर्षे कमी असल्यामुळे पोलिसांनी अखेर हा प्रेमविवाह थांबवून सर्वांना समज दिली

बार्शी : तरुण-तरुणीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले़ आम्ही एकमेकांशिवाय राहूच शकत नाही, असे म्हणताच दोन्ही कुटुंबांनी प्रसांगावधान राखले अन् त्यांच्या विवाहास सहमती दिली़लग्नाची तारीख, वेळ ठरली़ पण दोघांच्या डोक्यावर अक्षदा पडण्यापूर्वीच पोलीस दाखल झाले़ त्यांनी मुलाचे वय २१ नसल्याने कायद्यानुसार हा विवाह होऊ शकत नसल्याचे सांगून हा विवाह रोखला.आजवर अल्पवयीन मुलीचे होणारे बालविवाह प्रशासनाकडून रोखले गेले परंतु बार्शी तालुक्यात मुलगी सज्ञान आहे अन् मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण नसल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून हा विवाह रोखला.

हा प्रेमविवाह २९ सप्टेंबर रोजी दुपारी घरासमोर करण्याचे ठरले होते़ त्याप्रमाणे मोजकेच नातेवाईक त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी जमले.  मोजकीच मंडळी असलीतरी एकच धांदल उडालेली. 

विवाहाचा क्षण जवळ आला, तितक्यात पोलीस दारात दिसले अन् सर्वांनाच धक्का बसला़ नंतर चौकशी सुरू झाली़ घडले असे, तालुक्यातील एका गावात २१ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलाचा विवाह होत असल्याची माहिती तहसील प्रशासनास समजली. लागलीच त्यांनी शहर पोलीसांना कळविले़ त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी त्वरित दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा ठाकूर, हवालदार लक्ष्मण भांगे, श्रीमंत खराडे, रविकुमार लगदिवे, मलंग मुलाणी, महिला पोलीस स्वाती डोईफोडे यांचे पथक विवाहस्थळी दाखल झाले़ .

विवाहाच्या जय्यत तयारीत असलेल्या वधू-वरांसह पाहुणे, नातेवाईकांना त्यांनी थेट पोलीस ठाण्यात आणले. कायद्यानुसार हा विवाह करता येत नसल्याचे सांगितले आणि समज दिली़

दोघांचे वय समान, पण कायद्याचा अडसरमुलगा आणि मुलगी या दोघांच्या वयाची तपासणी पोलिसांनी केली. तेव्हा दोघांचेही वय १९ असल्याचे निष्पन्न झाले़ मुलाचे वय कायद्यानुसार २१ वर्षे असणे गरजेचे आहे तर वधूचे १८ वर्षे़ मुलाचे वय कायद्यानुसार दोन वर्षे कमी असल्यामुळे पोलिसांनी अखेर हा प्रेमविवाह थांबवून सर्वांना समज दिली़

टॅग्स :Solapurसोलापूरbarshi-acबार्शीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसmarriageलग्न