निवडणूक कर्तव्यात कसूर, वाहन चालकावर गुन्हा दाखल; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कारवाई

By दिपक दुपारगुडे | Published: April 23, 2024 06:44 PM2024-04-23T18:44:22+5:302024-04-23T18:44:36+5:30

शासनाचे वाहन चालकाविना उभे राहून खाजगी वाहने भाड्याने घ्यावी लागत होता. संबंधित वाहन चालक यांना कारणे दाखवा नोटीस देऊन हजर होण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतरही कर्मचारी हजर झाला नाही.

Offense in election duty, case filed against vehicle driver Action of Election Adjudicating Officers | निवडणूक कर्तव्यात कसूर, वाहन चालकावर गुन्हा दाखल; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कारवाई

निवडणूक कर्तव्यात कसूर, वाहन चालकावर गुन्हा दाखल; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कारवाई

सोलापूर  : माढा लोकसभा निवडणुकीत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पाटबंधारे प्रकल्पातील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांनी दिली.

४३ माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत २५४ माळशिरस अ. जा. विधानसभा मतदारसंघाच्या सर्व शासकीय कार्यालयातील वाहने व वाहन चालकांची सेवा निवडणुकीच्या कामकाजात वर्ग करण्यात आली आहे; परंतु उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे प्रकल्प अन्वेशन उपविभाग क्र. ४ माचणूर, मुख्यालय माळशिरस या कार्यालयाकडील वाहन चालक हे निवडणूक कर्तव्यात गैरहजर राहिल्याने निवडणूक कामी अडथळा निर्माण केला.

शासनाचे वाहन चालकाविना उभे राहून खाजगी वाहने भाड्याने घ्यावी लागत होता. संबंधित वाहन चालक यांना कारणे दाखवा नोटीस देऊन हजर होण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतरही कर्मचारी हजर झाला नाही.

Web Title: Offense in election duty, case filed against vehicle driver Action of Election Adjudicating Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.