शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

निमित्त विकास कामाच्या भूमिपूजनाचे... स्मशानातही फलक हार्दिक स्वागताचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 18:19 IST

नगरसेवकांनी ठाेकली भाषणे : महापालिका निवडणुकीची अशीही तयारी

सोलापूरमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विकासकामांच्या भूमिपूजनाचा जाेर आहे. रविवारी १४ स्मशानभूमीतील विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. काही ठिकाणी साध्या पध्दतीने भूमिपूजन झाले. देगाव स्मशानभूमीत ‘मान्यवरांचे हार्दिक स्वागत’ असे फलक पाहायला मिळाले, तर काही ठिकाणी नगरसेवकांची राजकीय भाषणे ऐकायला मिळाली.

महापालिका आणि स्मार्ट सिटी याेजनेतून १४ स्मशानभूमीत आवश्यक त्या ठिकाणी प्रवेशद्वार, संरक्षक भिंत, गॅस दाहिनी, स्वच्छतागृह, अंतर्गत काँक्रिटचे रस्ते, सौर पथदिवे, प्रतीक्षालय, कुपनलिका, पंप, बर्निंग शेड, पेव्हर ब्लाॅक, पथदिवे, पाण्याची टाकी, विद्युतदाहिनी आदी कामे करण्यात येणार आहेत. या कामांचे भूमिपूजन महापाैर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विविध प्रभागातील कामांचे उद्घाटन झाले. या उद्घाटन कार्यक्रमांसाठी नगरसेवकांनी जंगी तयारी केली हाेती. नेत्यांचे फलकही लावले हाेते. माेदी स्मशानभूमीत नगरसेवकांनी राजकीय भाषणे केली. देगाव स्मशानभूमीत आमदार, गटनेते, अधिकारी यांच्या हार्दिक स्वागताचा फलक पहायला मिळाला. यावर बरीच कुजबुजही झाले.

या कार्यक्रमांना सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, माजी आमदार नरसय्या आडम, गटनेता आनंद चंदनशिवे, रियाज खरादी, चेतन नराेटे, ज्येष्ठ नगरसेवक महेश कोठे, नगरसेवक संजय कोळी, देवेंद्र कोठे, गणेश वानकर, अविनाश बोंमड्याल, नागेश वल्याळ, नगरसेविका रामेश्वरी बिर्रु, राधिका पोसा, कुमुद अंकराम, राजू पाटील, जनार्दन कारमपुरी, अशोक इंदापुरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कामांसाठी स्मार्ट सिटी कंपनीने निधी दिला आहे; परंतु, महापालिका आणि स्मार्ट सिटीतील वादाच्या पार्श्वभूमीमुळे स्मार्ट सिटीचे अधिकारी या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत, असे सांगण्यात आले.

येथे सुरू झाले काम

कुमठे स्मशानभूमी, मोदी स्मशानभूमी, मोदी ख्रिश्चन स्मशानभूमी, देगाव मुस्लीम कब्रस्तान, जुना कारंबा नाका स्मशानभूमी, जुना पुना नाका स्मशानभूमी, भावसार स्मशानभूमी, रूपाभवानी रोड लिंगायत स्मशानभूमी, रूपाभवानी रोड हिंदू स्मशानभूमी, अक्कलकोट रोड जडे साहेब मुस्लीम स्मशानभूमी, अक्कलकोट रोड पद्मशाली स्मशानभूमी. या कामांसाठी २२ काेटी रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे.

----------

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाPoliticsराजकारणElectionनिवडणूक