शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

ओ काका... डांबरी नव्हे, खडीच्या रस्त्यामुळे उडणाºया धुळीतून गाठतोय शाळा बरं का...!

By appasaheb.patil | Updated: November 15, 2019 10:56 IST

इंडियन मॉडेल स्कूल ते सैफुल रस्ता बनला धोक्याचा : विद्यार्थ्यांनीच व्यक्त केली महापालिकेच्या कारभाराबाबत नाराजी

ठळक मुद्देआयएमएस स्कूल ते सैफुलपर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डेवाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहेझोन कार्यालयाने हे खड्डे बुजविण्याची तसदी घेतली नाही

सोलापूर : घंटा वाजली... शाळा सुटली... गेटमधून पटापटा मुले बाहेर पडली... ये चल ना... थांब रे प्रथम सायकल घेऊन येतो... एवढ्यात विद्यार्थ्यांना घरी पोहोचविण्यासाठी भराभरा शाळेच्या मुलांची वाहतूक करणाºया गाड्यांचा ताफा निघाला... एवढ्यात सायकलवरून येणाºया एका विद्यार्थ्याला लोकमतच्या छायाचित्रकारास पाहून ओ... काका, डांबरी नव्हे बरं का, खडीच्या रस्त्यामुळे उडत असलेल्या धुळीतून गाठतोय शाळा बरं का... असं म्हणत तो विद्यार्थी भुरकन निघून गेला.

आयएमएस स्कूल ते सैफुलपर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे़ जुळे सोलापुरातील ड्रेनेजलाईनचे काम पूर्ण झाल्यावर ड्रेनेज कनेक्शन देण्याच्या कामास सुरुवात झाली. त्यावेळी नागरिकांनी झोन कार्यालयाकडे ड्रेनेज कनेक्शनचे शुल्क भरून खड्डे खोदले, पण झोन कार्यालयाने हे खड्डे बुजविण्याची तसदी घेतली नाही. तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी ड्रेनेजसाठी खड्डे मारले असतील तर त्या शुल्कातून सिमेंटने खड्डे भरून घ्यावेत, अशी सूचना केली. आयुक्त पाहणीसाठी येणार म्हटल्यावर काही खड्डे सिमेंटने भरून घेण्यात आले. नंतर वाळू वाहतुकीमुळे रस्ता खचून खड्डे वाढत गेले.

आयएमएस स्कूल ते सैफुलपर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवात महापालिकेने या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले. ठेकेदाराने रुंदीकरण करताना एकाच बाजूने साईडपट्टी वाढविली. त्यानंतर गणपती व त्यानंतर देवीच्या मंडपामुळे हा भाग सोडून पुढील काम सुरू केले. दरम्यान, नवरात्रीपासून पाऊस सुरू झाल्यावर काम बंद करण्यात आले. सततच्या पावसामुळे हे काम बंद पडले. आता पाऊस बंद होऊन पंधरवडा उलटला तरी महापालिकेला रस्त्याचा ठेकेदार कोण हेच समजले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. या ठेकेदाराने अंथरलेल्या खडीवरून कसरत करीत नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. यात कहर म्हणजे ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे तो भाग काढून त्या ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. खड्डे तसेच अन् खडी बाजूला, असे या रस्त्याचे चित्र दिसत आहे. 

मुलांनी सायकल बंद केली- या रस्त्यावरून दररोज शेकडो मुले सायकलवरून शाळेला ये-जा करतात. पण खडीवरून सायकली घसरून अपघात होऊ लागल्याने पालकांनी त्यांना चालत पाठविणे पसंत केले आहे. याशिवाय विजयपूर महामार्गावरून सैफुल ते जुळे सोलापूरला संपर्क साधण्यासाठी हा रस्ता जवळचा असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. मीरानगरपर्यंत वाहने, महापालिकेच्या बस सुखरूप येतात, पण तिथून पुढे कसरतीचा रस्ता आहे. मधल्या पट्टीवरून जाण्यासाठी वाहनधारकांत स्पर्धा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे दररोज छोटे-मोठ अपघात व भांडणाचे प्रसंग घडत आहेत.

रस्त्याचा विकास करणार- या रस्त्यावरील वर्दळ लक्षात घेऊन रुंदीकरण करण्यात येत असल्याचे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी सांगितले. ऐन पावसाळ्यात हे काम हाती घेण्यात आले होते. पावसामुळे हे काम बंद पडले आहे. पण आता पावसाळा गेला तरी काम कधी सुरू होणार, याबाबत नागरिकांत सवाल उपस्थित केले जात आहेत. रुंदीकरणाचे कामही अर्धवट आहे. फक्त मीरानगरपर्यंत एक बाजूची साईडपट्टी भरण्यात आली आहे. त्यातही सातत्य दिसत नाही. मीरानगर ते सत्तूर फूट रोडपर्यंत खड्ड्यांची मालिका दिसत आहे. बिलालनगर ते जाधव निवासपर्यंत रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडले आहेत. 

या रस्त्यांवरून दररोज हजारो मुले शाळेसाठी ये-जा करतात़ रस्ता खराब असल्यामुळे बहुतांश मुलांच्या पालकांनी मुलांना सायकलवरून शाळेला जाण्यासाठी नकार दिला आहे़ अशातच काही विद्यार्थी हे या रस्त्यावरून ये-जा करीत असताना खड्ड्यात पडून छोटे-मोठे अपघात घडत आहेत़ त्वरित हा रस्ता दुरुस्त करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, एवढीच अपेक्षा़- वनमाला पाटीलरहिवासी, सिद्धेश्वर पार्क

आयएमएस स्कूल ते सैफुलपर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत़ याकडे महापालिकेच्या अधिकाºयांकडून दुर्लक्ष होत आहे़ त्वरित रस्ता करण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाºयांनी पुढाकार घ्यावा़ हजारो विद्यार्थी या मार्गावरून ये-जा करीत असतात़ किमान विद्यार्थ्यांचा तरी विचार करून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे़ - सरिता जाधवरहिवासी, आयएमएस स्कूलजवळ

या मार्गावरून जाणाºया जडवाहतुकीमुळे हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे़ या रस्त्यावर शेकडो जीवघेणे खड्डे आहेत़ त्यामुळे या रस्त्यावरून जाताना अनेक वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे़ महापालिकेच्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, एवढीच अपेक्षा़- कविता होटकररहिवासी, आयएमएस स्कूलजवळ, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSchoolशाळाEducationशिक्षण