शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ओ पप्पा.. मला.. तोच मोबाईल हवाय, तुम्ही प्रॉमिस केला होता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 16:02 IST

खरेदीसाठी मोबाईल दुकानांत गर्दी : दहावी उत्तीर्ण झालेल्या यशवंतांचा पालकांकडे आग्रह

ठळक मुद्देआई-वडिलांच्या अपेक्षेप्रमाणे परीक्षेत मार्क्स मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा ओढा नवीन मोबाईल खरेदी करण्याकडे लागलानवी पेठ, सात रस्ता, विजापूर रोड आदी परिसरातील मोबाईल दुकानांत विद्यार्थी व पालकांची गर्दी

सोलापूर : दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. त्यानंतर लगेचच आई-वडिलांच्या अपेक्षेप्रमाणे परीक्षेत मार्क्स मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा ओढा नवीन मोबाईल खरेदी करण्याकडे लागला आहे. ओ पप्पा.. मला तोच मोबाईल हवाय.. तुम्ही मला प्रॉमिस केला होतात.. असाच आग्रह यशवंतांनी पालकांकडे मोबाईल दुकानात धरला असल्याचे दिसून येत होते. 

बहुतेक पालकांनी आपला मुलगा-मुलगी दहावी परीक्षेत किमान ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवावेत, अशी अपेक्षा ठेवली होती. मुलांच्या यशाकरिता आवश्यक असलेल्या सर्व शैक्षणिक गरजा पालकांकडूनही पुरविण्यात आल्या. मोबाईलमुळे अभ्यासात व्यत्यय येत असल्याने परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मोबाईल घेऊन देण्याचे आश्वासन पालकांनी मुलांना दिले होते. त्यामुळेच नवी पेठ, सात रस्ता, विजापूर रोड आदी परिसरातील मोबाईल दुकानांत विद्यार्थी व पालकांची गर्दी दोन दिवसांत वाढल्याचे दिसून येत आहे.

परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाल्यानंतरच मुलांनी मोबाईलसाठी आईबाबांकडे आग्रह धरल्याने याच दिवशी सायंकाळपासून मोबाईल दुकानांत गर्दी दिसून येत होती.. रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही मोबाईल खरेदी करताना विद्यार्थी आणि पालकांनी चांगलीच गर्दी केल्याचे दिसून आले. अकरावी प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही गर्दी राहण्याचा अंदाज मोबाईल विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. 

फुल्ल एचडी, हाय बॅटरीच्या मोबाईलला पसंती : शेख ४- एचडी, हाय बॅटरी क्षमता असणाºया मोबाईलची खरेदी करण्यास त्यांच्याकडून पसंती देण्यात येत आहे. ६ जीबी रॅम, १२८ अंतर्गत मेमरी क्षमता व पाच हजार एमएच बॅटरी क्षमता असलेल्या गुणवत्तायुक्त मोबाईल खरेदीस अधिक पसंती मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी उपयोगी ठरणारा मोबाईल घेण्याचा कलही दिसून येत असल्याची माहिती हुमा मोबाईल शॉपीचे मालक हिशाम शेख यांनी दिली.

स्वस्त व लेटेस्ट मोबाईल खरेदीस पसंती : फाटे- सर्वसामान्य कुटुंबातील यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची मोबाईल खरेदीसाठी गर्दी होत आहे. सर्वसामान्य पालकांना परवडेल अशा किमतीत असणाºया लेटेस्ट मॉडेलच्या मोबाईल खरेदीसही पालकांची पसंती मिळत आहे. अनेक सुविधा उपलब्ध असलेला मोबाईल मिळत असल्याने विद्यार्थीही आनंदी होताना दिसून येत असल्याची माहिती संजय इन्टरप्रायझेसचे मालक पंकज फाटे यांनी दिली. 

दहावी परीक्षेत चांगले गुण मिळाल्यानंतर चांगला मोबाईल घेऊन देण्याचा शब्द मुलाला दिला होता. परीक्षेत चांगले गुण मिळाल्याचा आनंद आहेच, त्यात मुलाला मोबाईल देण्याचा दिलेला शब्द पूर्ण करतानाही आनंद होत आहे. - तुकाराम कांबळे, पालक

टॅग्स :SolapurसोलापूरMobileमोबाइलSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थी