शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

‘ऑनलाइन’ वीज बिल भरणाºयांची संख्या सहा महिन्यांत तीस हजारांनी वाढली !

By appasaheb.patil | Updated: March 19, 2020 17:10 IST

महावितरण; ५०० रुपयांच्या मर्यादेत ग्राहकांना मिळतेय ०.२५ टक्के सूट

ठळक मुद्देमहावितरणने लघुदाब वीजग्राहकांना ‘ऑनलाइन’ बिल भरण्यासाठी वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपची सेवाऑनलाइन भरणा करण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश काडर््सचा पर्याय महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपवरून घरबसल्या वीज बिलांचा भरणा करावा

सोलापूर : महावितरणची वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपद्वारे ‘ऑनलाइन’ वीज बिल भरणाºया लघुदाब वीजग्राहकांची संख्या गेल्या सहा महिन्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये ३० हजारांनी वाढली आहे. वीज बिल भरणा केंद्रांतील गर्दी टाळण्यासाठी तसेच रांगेत उभे राहण्याऐवजी शक्यतो वीजग्राहकांनी वीज बिलांचा भरणा घरबसल्या ‘ऑनलाइन’द्वारे करावा, असे आवाहन महावितरणच्या सोलापूर विभागाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपद्वारे वीज बिल भरण्यास वीजग्राहकांची पसंती दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ५०० ग्राहकांनी गेल्या आॅगस्ट २०१९ मध्ये वीज बिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला होता. त्या तुलनेत गेल्या जानेवारीमध्ये १ लाख ३१ हजार ग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. यात अकलूज विभागामध्ये २८००, बार्शी विभाग - ५६००, पंढरपूर विभाग - ६८००, सोलापूर ग्रामीण विभाग - ५८०० तर सोलापूर शहर विभागात - ९५०० अशी एकूण ३० हजार ५०० ग्राहकसंख्या सोलापूर जिल्ह्यात वाढली आहे.

‘ऑनलाइन’ बिल भरणा नि:शुल्क- क्रेडिट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीज बिल भरण्यासाठी ‘ऑनलाइन’चे उर्वरित सर्व पर्याय आता नि:शुल्क करण्यात आले आहेत. याआधी नेटबँकिंगचा अपवाद वगळता वीज बिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा करण्यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडिट कार्ड वगळता नेटबँकिंग, डेबिट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाइन’द्वारे होणारा वीज बिल भरणा आता नि:शुल्क करण्यात आलेला आहे. तरी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

‘आॅनलाईन’ बिल भरल्यास मिळतेय सूट...लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाइन’ बिल भरण्यासाठी दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बँकिंगद्वारे वीज बिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. ही सूट मिळविण्यासाठी संबंधित ग्राहकांकडे वीज बिलांची थकबाकी नसावी तसेच वीज बिलांचा भरणा हा प्रॉम्ट पेमेंट डिस्काऊंटच्या निर्धारित वेळेत करणे आवश्यक आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वत:च्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपवरून घरबसल्या वीज बिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणने लघुदाब वीजग्राहकांना ‘ऑनलाइन’ बिल भरण्यासाठी वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपची सेवा उपलब्ध आहे. आॅनलाईन भरणा करण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश काडर््सचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे.- ज्ञानदेव पडळकर,अधिक्षक अभियंता, महावितरण 

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरणonlineऑनलाइनdigitalडिजिटल