शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘लालपरी’ करणार मालवाहतूक; शेतीमाल वाहतुकीसाठी १०० बस तैनात...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 14:29 IST

पंढरपूर आगार; शेतकºयांच्या शेतातील माल बाजारपेठेपर्यंत नेणे सोयीचे होणार

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटीला तोटा सहन करावा लागला फळे, भाजीपाल्यासह इतर शेतीउत्पादने वाहतुकीला परवानगी मिळाली शेतकºयांच्या शेतातील माल बाजारपेठेपर्यंत नेणे सोयीचे होणार

ज्योतीराम शिंदे पंढरपूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून एसटीची प्रवासी वाहतूक थांबवली आहे. यामुळे पंढरपूर बस आगाराला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. यातच आता फळे, भाजीपाल्यासह इतर मालवाहतूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, याकडेही शेतकºयांनी पाठ फिरवली तर एसटीच्या तोट्यात आणखी भर पडणार आहे. याअगोदरच एसटीची प्रवासी वाहतूक बंद केल्यापासून आजअखेर ३५ हजार ४ फेºयांद्वारे २२ लाख ७७ हजार कि. मी. अंतरावरील प्रवासासाठी ६९ कोटी रुपयांचे पंढरपूर आगाराचे उत्पन्न बुडाले आहे.

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात २२ मार्चपासून प्रवासी वाहतूक थांबवली होती. यानंतर दोन महिन्यांनी लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर २२ मेपासून जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. परंतु शाळा, महाविद्यालये, विवाह सोहळ्यांवर कायम बंदी असल्यामुळे तसेच तालुक्याच्या ठिकाणावरील बाजारपेठ पूर्णपणे खुली झाली नसल्याने प्रवाशांनी एसटीच्या प्रवासाकडे पाठ फिरवली आहे. याचा तोटा एसटी महामंडळाला सहन करावा लागत आहे. 

२२ मेपासून जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू केली असली तरी अजूनही शेकडो बस जागेवरच थांबून आहेत. जिल्ह्यांतर्गत वाहतुकीलाही प्रवाशांचा म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही. यामुळे एसटी बस रिकाम्याच फिरवाव्या लागत आहेत. याचा महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी काही प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू केली. परंतु त्याला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी आणि शेतकºयांची सोय व्हावी, यासाठी एसटी महामंडळाने आता प्रवासी वाहतुकीबरोबरच शेतीमालाची बाजारपेठेपर्यंत वाहतूक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक सुधीर सुतार यांनी सांगितले.

शेतीमाल वाहतुकीसाठी १०० बस तैनात- एस.टी. महामंडळाकडून २२ मेपासून जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, प्रवाशांनी याकडे पाठ फिरवल्यामुळे एस.टी. बस रिकाम्याच फिरू लागल्या. याचा महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे एस.टी. महामंडळाने शेतकºयांचा शेतीमाल बाजारपेठेपर्यंत वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पंढरपूर आगाराने १०० बस तैनात केल्या आहेत. यामुळे शेतकºयांच्या शेतातील माल बाजारपेठेपर्यंत नेणे सोयीचे होणार असल्याचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक सुधीर सुतार यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटीला तोटा सहन करावा लागला आहे. याला पर्याय म्हणून फळे, भाजीपाल्यासह इतर शेतीउत्पादने वाहतुकीला परवानगी मिळाली आहे. याचा एस.टी. महामंडळाला फायदाच होईल. यासह विविध उत्पादनांची वाहतूक करण्यास परवानगी दिली तर अजूनही एस.टी. महामंडळाच्या उत्पादन वाढीसाठी याचा उपयोग होईल.- सुधीर सुतारवरिष्ठ आगार व्यवस्थापक, पंढरपूर

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीBus DriverबसचालकPandharpurपंढरपूर