शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

सोलापूरात बेकायदा बांधकाम पाडकाम सुरू, महानगरपालिकेची कारवाई, बांधकाम नियमित न करणाºयासाठी पाठविल्या नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 13:06 IST

क्लब हाऊसचा परवाना असताना बेकायदा बांधकाम करून मंगल कार्यालयाचा वापर करणाºया होटगी रोड इंडस्ट्रियल इस्टेटजवळील कॅसल ग्रीनची भिंत मनपाच्या बांधकाम विभागाच्या पथकाने पाडून टाकली. 

ठळक मुद्देबांधकाम पाडकामासाठी परवानाधारकांनी मुदत मागून घेतलीबेकायदा बांधकाम करणाºयांना नियमितीकरणास शासनाने परवानगी दिलीपाडकाम नियमाप्रमाणे झाले की नाही याची पुन्हा तपासणी केली जाईल : उपअभियंता रामचंद्र पेंटर

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : क्लब हाऊसचा परवाना असताना बेकायदा बांधकाम करून मंगल कार्यालयाचा वापर करणाºया होटगी रोड इंडस्ट्रियल इस्टेटजवळील कॅसल ग्रीनची भिंत मनपाच्या बांधकाम विभागाच्या पथकाने पाडून टाकली. याबाबत निवृत्त पोलीस अधिकारी अंगद देवकते यांनी तक्रार केली आहे. यावरून मनपाच्या बांधकाम परवाना विभागाने दिलीप चव्हाण व बिद्री यांना बेकायदा बांधकाम पाडण्याची नोटीस बजावली होती. त्यांनी काहीच हालचाल न केल्याने गेल्या महिन्यात मनपाच्या पथकाने जेसीबीने किचन व स्वच्छतागृहाचे पाडकाम केले होते. त्यावर इतर बांधकाम पाडकामासाठी परवानाधारकांनी मुदत मागून घेतली होती. पण यावर तक्रारदार देवकते यांचे समाधान झाले नाही. त्यांनी याबाबत लोकशाही दिनात तक्रार मांडली. मनपाच्या अधिकाºयांनी जाणूनबुजून मंगल कार्यालय चालविण्यास झुकते माप दिल्याचा आरोप केला. ज्या ठिकाणी क्लब हाऊसचा परवाना घेतला तेथे २०११ पासून मंगल कार्यालय चालविण्यात येत आहे. बाजूने कुंपण घालून आत बाग व क्लबच्या आठ खोल्यांचा वापर यासाठी केला जात आहे. पाडलेले किचन पुन्हा पूर्ववत केल्याचे त्यांनी निदर्शनाला आणले होते. त्यावर मनपाच्या पथकाने  पुन्हा कारवाई केली. प्रवेशद्वाराजवळ उभी केलेली एक भिंत पथकाने जेसीबीने पाडून टाकली. यावेळी तक्रारदार देवकते उपस्थित होते. प्रवेशद्वार व कुंपणाचे बेकायदा बांधकाम पाडावे, अशी त्यांनी मागणी केली. पण परवान्यापेक्षा जादा बांधकाम इतकेच असल्याचे सांगून पथकातील अवेक्षक एकबोटे व कर्मचारी परतले. कायद्याप्रमाणे कारवाई न झाल्यास फौजदारी करण्याचा इशारा देवकते यांनी दिला. पाडकाम नियमाप्रमाणे झाले की नाही याची पुन्हा तपासणी केली जाईल, असे बांधकाम परवाना विभागाचे उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी सांगितले.----------------------------नियमितीकरणाकडे दुर्लक्ष....बेकायदा बांधकाम करणाºयांना नियमितीकरणास शासनाने परवानगी दिली आहे. ज्यांना नोटिसा दिल्या त्यांनी अद्याप याबाबत अर्ज दिलेला नाही. अशा १९ जणांना अंतिम नोटीस बुधवारी जारी करण्यात आली. यात शिवप्रकाश चव्हाण (अक्कलकोट रोड), श्रीकांत डोंबे, प्रसाद श्रीराम, अनिल श्रीराम, सुभांशु भालेराव, राहुल दबडे (रविवारपेठ, अक्कलकोट रोड), पद्मालय हॉलच्या राजश्री चिंदे (नूतननगर), राजमाता गार्डनचे शिवलिंग म्हेत्रे व इतर, मर्दा मंगल कार्यालयाचे नवनीत मर्दा, बोल्ली मंगल कार्यालयाचे नारायण काळपगार, उषा लॉनचे किशोर अंबुरे, भाऊसाहेब गायकवाड, सविता गायकवाड (न्यू पाच्छापेठ), श्रीनिवास चिलका, महेश ठाकरे, राजेंद्र सिंगी व इतर (भद्रावतीपेठ), डॉ. सत्यजित वाघचवरे, डॉ. अभिजित वाघचवरे (होटगी रोड), शोभा गायकवाड, शुभांगी हिरेमठ, वैभव मेरू, साजीद सय्यद, (रेल्वेलाईन), डॉ. संतोष आडके, निलांबरी आडके (बेडर पूल), डॉ. नितीन तोष्णीवाल (रिमांड होमजवळ) यांचा समावेश आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका