शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

धर्मादाय कायद्याखाली नोंदणी असलेल्या रूग्णांलयाची अचानक होणार तपासणी,  समिती स्थापन करण्याचे  सहकारमंत्र्यासह जिल्हाधिकाºयांच्या सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 12:54 IST

धर्मादाय कायद्याखाली नोंदणी असलेल्या रुग्णालयातून गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात का नाही, याची तपासणी करण्यासाठी समिती नियुक्त केली जाणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी यांचा समितीत समावेश असेल.

ठळक मुद्देधर्मादाय आयुक्त कार्यालयानेही या रुग्णालयांना अचानक भेटी देऊन तपास करावा, अशा सूचनाजिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी यांचा समितीत समावेशया योजनेची अंमलबजावणी न करणाºया रुग्णालयांवर कारवाईचे अधिकार धर्मादाय आयुक्तांना आहेत

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २७ : धर्मादाय कायद्याखाली नोंदणी असलेल्या रुग्णालयातून गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात का नाही, याची तपासणी करण्यासाठी समिती नियुक्त केली जाणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी यांचा समितीत समावेश असेल. त्याचबरोबर धर्मादाय आयुक्त कार्यालयानेही या रुग्णालयांना अचानक भेटी देऊन तपास करावा, अशा सूचनाही करण्यात आल्या.सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अणदूरकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, सहधर्मादाय आयुक्त गीतांजली कोरे आदी उपस्थित होते.-----------------------दर्शनी भागात फलक लावा- सहकारमंत्री देशमुख म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांसाठी दहा टक्के राखीव खाटा ठेवण्यात येतात. याची माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावणे अपेक्षित आहे. परंतु, अनेक रुग्णालये माहिती फलक लावत नाहीत. यापुढे हे फलक लावण्यात यावेत. सर्व रुग्णालयात जमा होणाºया देयकाच्या दोन टक्के रक्कमही बाजूला काढून ठेवली जाते का? त्यामधून गरीब रुग्णांवर उपचार केले जातात का, याची तपासणी केली जावी, असेही त्यांनी सांगितले. -----------------या रुग्णालयांचा समावेश- अश्विनी ग्रामीण रुग्णालय, कुंभारी. कर्मवीर औदुंबरराव पाटील ट्रस्ट, पंढरपूर. मल्लव्वाबाई वल्याळ डेंटल हॉस्पिटल, सोलापूर. अल-फैज जनरल हॉस्पिटल, सिध्देश्वर पेठ, सोलापूर. गोविंदजी रावजी आयुर्वेद रुग्णालय, सोलापूर. यशोधरा हॉस्पिटल. सिध्देश्वर कॅन्सर हॉस्पिटल. जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी. मल्लव्वाबाई वल्याळ डेंटल हॉस्पिटल, केगाव. युगंधर हॉस्पिटल, मजरेवाडी. दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, बार्शी. ब्रिजमोहन फोफलिया नेत्रालय. लोकमंगल जीवक हॉस्पिटल. इंडियन कॅन्सर सोसायटी. गांधी नाथा रंगजी हॉस्पिटल. कासलीवाल हॉस्पिटल. धनराज गिरजी ट्रस्ट़ जनकल्याण हॉस्पिटल, पंढरपूर. ------------------तक्रारी कळवा- या योजनेची अंमलबजावणी न करणाºया रुग्णालयांवर कारवाईचे अधिकार धर्मादाय आयुक्तांना आहेत. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून रुग्णालयांची तपासणी होत नाही. त्यामुळे रुग्णालयांनाही कायद्याची भीती उरलेली नाही. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले की, धर्मादाय रुग्णालयांची तीन समितीच्या माध्यमातून तपासणी केली जाते. मात्र या योजनेची अंमलबजावणी होते की नाही याची पाहणी समिती करेल. रुग्णांनीही तक्रार केल्यास संबंधित रुग्णालयांवर कारवाई होईल. 

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलSubhash Deshmukhसुभाष देशमुख