शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहरातील ८५ गाळेधारकांना महापालिका बांधकाम विभागाकडून नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 14:40 IST

 अनधिकृत बांधकामधारकांमध्ये खळबळ

ठळक मुद्देअनधिकृत बांधकामाबाबत वेळोवेळी सूचना दिल्यामहापालिकेच्या बांधकाम विभागाकडून पुढील कार्यवाहीला प्रारंभ

सोलापूर : रविवार पेठ परिसरात असलेल्या २५६ गाळ्यांमधील अतिरिक्त अनधिकृत बांधकामे केलेल्या ८५ गाळेधारक घरांना महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून नोटिसा देण्यात आल्याची माहिती नगर अंभियता  संदीप कारंजे यांनी दिली. या प्रकारामुळे सध्या गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

रविवार पेठेतील २५६ गाळ्यांमधील अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावरून गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेत चर्चा सुरू आहे. या परिसरातील गाळेधारकांपैकी सुमारे ८५ गाळ्यांतील घरधारकांनी आपल्या मूळ बांधकामाबरोबर त्यांना दिलेल्या परवान्यापेक्षा त्याव्यतिरिक्त अतिरिक्त बांधकाम केले असल्याचे तपासात दिसून आले आहे. त्यांच्या या अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्याचा मुद्दा उपस्थित झाला होता.

यावरून या गाळेधारकांकडून अनेकांनी महापालिकेकडे यावर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासनाकडे प्रयत्न केले. महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनीही बैठका घेऊन त्यांना त्यांचे बांधकाम पाडण्यास किंवा नियमित करून घेण्यासाठी सांगितले होते. मात्र संबंधित गाळेधारकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून पुढील कार्यवाहीला प्रारंभ करण्यात आला आहे. 

याचाच एक भाग म्हणून बांधकाम विभागाने महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९६६ चे कलम ५५ अन्वये अनधिकृत व अतिरिक्त बांधकामधारक ८५ गाळ्यांना नोटीस पाठविली आहे. त्यांना १५ दिवसात आपले अतिरिक्त अनधिकृत बांधकाम स्वत:हून पाडून घ्यावे, असे सांगून त्यांना १५ दिवसांची मुदत दिली असल्याचे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

बांधकाम पाडा, अन्यथा कारवाई अटळ- २५६ गाळ्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. या ठिकाणी बºयाच गाळेधारकांनी अनधिकृत बांधकाम करुन नियमांचे उल्लंघन केले आहे. ही बाब महापालिका प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर संबंधितांना अनेकवेळा सूचना देण्यात आल्या. मात्र याकडे गाळेधारकांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. यामुळे महापालिकेने कारवाईचे हत्यार उपसले असून  दिलेल्या वेळेत जर अनधिकृत बांधकाम पाडून घेतले नाही तर संबंधितांवर कारवाई अटळ आहे. 

  1. अनधिकृत बांधकामाबाबत वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. सध्या ८५ जणांना नोटिसा दिल्या आहेत, अन्य संबंधितांनी दिलेल्या मुदतीत अनधिकृत बांधकाम न पाडल्यास महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून पाडण्यात येईल व त्याचा खर्च संबंधित गाळेधारकाकडून वसूल करण्यात येणार आहे. 
  2. - संदीप कारंजे, नगर अंभियता 
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका