आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २७ : बंदी काळातही जिल्ह्यात अवैध वाळू उपसा जोमात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पोलीस, आरटीओ यांनी समन्वय राखून टोलनाक्यासह संभाव्य ठिकाणी गस्ती पथक नेमावे, अशा सूचना केल्या. या प्रकरणात महसूल अधिकारीही सहभागी असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.शासनाच्या आदेशानुसार अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. हरित लवादाने वाळू उपशासंदर्भात अनेक निर्बंध लादले आहेत. अनेक अपप्रवृत्तींबाबत तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई सुरू करावी. महसूल अधिकाºयांनी त्याला सहकार्य करावे. दोषींवर प्रसंगी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करावी. वाहनांचे परवाने निलंबित करण्याबरोबर त्यांना दंड ठोठवावा, अशा सूचनाही जिल्हाधिकाºयांनी केल्या. -------------------अपर जिल्हाधिकाºयांनी समन्वय ठेवावा४या कारवाईबाबतचा समन्वय अपर जिल्हाधिकाºयांकडे सोपविण्यात आला आहे. पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, सांगोला या तालुक्यातील ठिकाणे प्रशासनाच्या रडारवर आहेत. या ठिकाणी कालबध्द कार्यक्रम राबवून भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई करावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाºयांनी केली. -------------------अक्कलकोटबाबत कारवाई करू - अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे. अक्कलकोट तहसीलदारांनी चार दिवसांपूर्वी अवैध वाळू उपशावर कारवाई केली. परंतु अनेक लोक पळून गेले. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट येथील तलाठी, मंडल अधिकारी वाळू ठेकेदारांना ‘टीप’ देतात. त्यामुळे कारवाईचा फार्स होतो़ याबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना विचारले असता त्यांनी यासंदर्भात नावे कळाल्यास तत्काळ कारवाई करू, असे सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुक रोखावी, आरटीओ, पोलिसांना जिल्हाधिकाºयांनी केल्या सुचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 13:01 IST
बंदी काळातही जिल्ह्यात अवैध वाळू उपसा जोमात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पोलीस, आरटीओ यांनी समन्वय राखून टोलनाक्यासह संभाव्य ठिकाणी गस्ती पथक नेमावे, अशा सूचना केल्या.
सोलापूर जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुक रोखावी, आरटीओ, पोलिसांना जिल्हाधिकाºयांनी केल्या सुचना
ठळक मुद्देपोलीस, आरटीओ यांनी समन्वय राखून टोलनाक्यासह संभाव्य ठिकाणी गस्ती पथक नेमावेया प्रकरणात महसूल अधिकारीही सहभागी असतील तर त्यांच्यावर कारवाई करा - जिल्हाधिकारीअवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली