शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

सेवा बंद ठेवल्याबद्दल सोलापुरातील २८ रुग्णालयांना नोटिसा; सील ठोकण्याचा दिला इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 11:13 IST

सोलापूर महापालिकेच्या कारवाईवर डॉक्टरांनी घेतला आक्षेप; ऐकीव माहितीवर नोटीस बजावल्याचे म्हणणे

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले नर्सिंग होम, हॉस्पिटल यांना ओपीडी व आयपीडीच्या माध्यमातून वैद्यकीय उपचार सुविधा देणे बंधनकारकआपत्तीच्या काळात आपली रुग्णालये बंद ठेवणाºया डॉक्टरांवर कारवाई

सोलापूर : कोरोना आपत्तीच्या काळात आरोग्य सेवा बंद ठेवल्याचे सांगत शहरातील २८ रुग्णालयांच्या प्रमुखांना महापालिकेच्या आरोग्य अधिकाºयांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. रुग्णालय तत्काळ सुरू न केल्यास ते सील करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. परंतु, अनेक रुग्णालयांच्या डॉक्टरांनी या नोटिसीला हरकत घेतली आहे. आरोग्य विभागाने प्रत्यक्ष माहिती न घेता ऐकीव माहितीवर ही नोटीस बजावल्याचा आरोप केला आहे. 

महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले म्हणाले, जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील नर्सिंग होम, हॉस्पिटल यांना ओपीडी व आयपीडीच्या माध्यमातून वैद्यकीय उपचार सुविधा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, अनेक रुग्णालये बंद असल्याच्या तक्रारी येत आहेत. रुग्ण थेट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. सरकारी यंत्रणेवर ताण येत आहे. आपत्तीच्या काळात आपली रुग्णालये बंद ठेवणाºया डॉक्टरांवर कारवाई करा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. 

लोकांनी काही रुग्णालयांबाबत तक्रारी केल्या. यात २८ नर्सिंग होम, रुग्णालये बंद असल्याचे आढळून आले. यासंदर्भात दोन दिवसांत खुलासा सादर करावा. खुलासा सादर न केल्यास रुग्णालय, नर्सिंग होम सील करण्यात येणार आहे. 

यांना बजावल्या नोटिसा..- जाधवर नर्सिंग होम, भंडारी हॉस्पिटल, विजय क्लिनिक, स्पर्श निरो केअर हॉस्पिटल, सुरतकर नर्सिंग होम, लोणीकर हॉस्पिटल, बिराजदार हॉस्पिटल, झांबरे नर्सिंग होम, अंबिका हॉस्पिटल, मार्इंड इन्स्टिट्यूट न्यूरोफिजेटरी अँड डायटेशन अँड रिहॅबिटेशन सेंटर, एस. एस. बलदवा न्यूरो सायन्स अँड ह्युमन केअर हॉस्पिटल, सारडा हॉस्पिटल, चिडगुपकर हॉस्पिटल, जैन हॉस्पिटल, मांगल्य नर्सिंग होम, सुयश नर्सिंग होम, ओंकार नर्सिंग होम, लाईफ लाईन हॉस्पिटल, साठे नर्सिंग होम, शोभा नर्सिंग होम, कृष्णामाई नर्सिंग होम, संजीवनी नर्सिंग होम, व्यंकटेश हॉस्पिटल, सावस्कर हॉस्पिटल, दंतकाळे नर्सिंग होम, तुंबळ हॉस्पिटल, कार्वेकर हॉस्पिटल, कुमठेकर हॉस्पिटल.

नागरिकांच्या तक्रारीवरून नर्सिंग होम, हॉस्पिटल यांना नोटिसा बजावल्या आहेत. रुग्णालये सुरू असतील तर त्यांनी तारखेनुसार माहिती सादर करावी. ही नोटीस त्रास देण्याच्या उद्देशाने दिलेली नाही, लोकांनी केलेल्या तक्रारींमुळे दिली आहे. दवाखाने सुरू असतील तर काहीच अडचण नाही. -डॉ. संतोष नवले, आरोग्य अधिकारी, महापालिका. 

महापालिकेच्या आरोग्य अधिकाºयांनी कोणतीही माहिती न घेता नोटीस बजावली आहे. आमचे हॉस्पिटल २४ तास सुरू आहे. सरकारने आम्हाला कोणत्याही प्रकारचे पीपीई किट, सुरक्षा यंत्रणा पुरवलेली नाही. आमचे काही कर्मचारी प्रतिबंधित क्षेत्रात राहायला आहेत. त्यामुळे ते कामावर येऊ शकले नाहीत. उपलब्ध कर्मचाºयांच्या मदतीने काम सुरू आहे. या परिस्थितीत महापालिका आम्हाला अशी धमकीवजा नोटीस कशी काय देऊ शकते. ऐकीव माहितीवर बजावलेल्या नोटिसीला उत्तर देण्यात आम्ही वेळ का घालवायचा.? आम्ही रुग्णालयात सेवा द्यायची की अशा नोटिसांना उत्तर द्यायचे. - डॉ. शिरीष कुमठेकर, कुमठेकर हॉस्पिटल, जुळे सोलापूर. 

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका