शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठविल्या जात आहेत नोट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:16 IST

विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम होणार पूर्ण;  शंका असल्यास प्राध्यापकांशी संपर्क साधण्याचे आवाहन

ठळक मुद्देआॅनलाईन पद्धतीने शिक्षण हा चांगला निर्णय विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलाअनेक विद्यार्थी हे गावाकडे राहत असल्यामुळे इंटरनेटचा वापर करता येत नाही़सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि युट्यूबमधील व्हिडीओचे लिंकही विद्यार्थ्यांना पाठविण्यात येत आहे

सोलापूर : कोरोना व्हायरसमुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर झाल्यापासून विद्यार्थ्यांचा उर्वरित अभ्यासक्रमांविषयीचा प्रश्न निर्माण झाला होता़ यामुळे यावर तोडगा काढत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने आॅनलाईन शिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे़ या निर्णयाची अंमलबजावणी विद्यापीठातील काही संकुलांमधून सुरू झाल्याचे चित्रही पाहायला मिळत आहे़ संकुलांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून त्यांना नोट्स पाठविण्यात येत आहेत.

राज्य शासनाने खबरदारी म्हणून १६ ते ३१ मार्चदरम्यान शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक विषयांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती़ यामुळे विद्यापीठाने यावर तोडगा काढत विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण देण्याचे ठरविले़ विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या या निर्णयाची काही संकुलप्रमुखांनी लगेच अंमलबजावणी सुरू केली आहे़   सोमवारी विविध संकुलांतील विषयप्रमुखांनी विद्यार्थ्यांना पी़पी़टी़च्या माध्यमातून नोट्सही पाठविण्यास सुरू वात केली आहे़ प्रत्येक विद्यार्थ्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून नोट्स पाठविण्यात आले आहे़ याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन नोट्समध्ये अडचणी आल्यास त्यांनी विषयप्रमुखांना संपर्क साधावा, असेही यामध्ये सांगण्यात आले आहे.

आॅनलाईनमुळे अडचण- आॅनलाईन पद्धतीने शिक्षण हा चांगला निर्णय विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आला. पण विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाही, अनेक विद्यार्थी हे गावाकडे राहत असल्यामुळे इंटरनेटचा वापर करता येत नाही़ याचबरोबर त्यांच्याकडून मेल आयडीचाही वापर अल्प प्रमाणात केला जातो़ यामुळे या विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे़ यामुळे अशा आॅनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना नुकसान होणार आहे़ 

महाविद्यालये बंद असल्यामुळे संकुलातील विद्यार्थ्यांना आता आॅनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचे सांगण्यात आले आहे़ यामुळे संकुलाच्या वतीने लगेच विद्यार्थ्यांना नोट्स तयार करून ई-मेलव्दारे, सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि युट्यूबमधील व्हिडीओचे लिंकही विद्यार्थ्यांना पाठविण्यात येत आहे़ याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांशी संपर्क होत नाही त्यांना त्यांच्या वर्गमित्रांशी संपर्क साधून आम्ही नोट्स पाठविण्याचा प्रयत्न करत आहोत़ - डॉ़. गौतम कांबळे, संचालक , सामाजिक शास्त्रे संकुल

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरexamपरीक्षा