शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

हुशार नवरा नको गं बाई...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 14:13 IST

तिला घेऊन तिचे आई-वडील आॅफिसला आले. तिचे डोळे रडून रडून सुजले होते. तर तिच्या आई-वडिलांचेही डोळे अश्रू गाळून सुकलेले ...

तिला घेऊन तिचे आई-वडील आॅफिसला आले. तिचे डोळे रडून रडून सुजले होते. तर तिच्या आई-वडिलांचेही डोळे अश्रू गाळून सुकलेले होते. ती इंजिनिअर होती. तिचा नवरा अमेरिकेत शास्त्रज्ञ होता. भरपूर पगार होता. अत्यंत हुशार, सुवर्णपदक विजेता होता. पदवी परीक्षा दिल्यानंतर तो सर्वोच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. उच्च पदवीनंतर ताबडतोब त्याला तेथे नोकरी लागली होती. एका नातेवाईक मध्यस्थामार्फत लग्न जमले. लग्नानंतर ती त्याच्याबरोबर अमेरिकेला रवाना झाली. प्रवासादरम्यान तिला वाटू लागले, नवºयाने तिच्याबरोबर लग्न केले की लॅपटॉपसोबत? कारण संपूर्ण प्रवासभर तो तिच्याशी अगदी थोडेच बोलला. संपूर्ण वेळ लॅपटॉपशीच बोलत राहिला. अमेरिकेत पोहोचल्यानंतर तो लगेच कामावर निघून गेला. 

सायंकाळी आल्यानंतर त्याने आपणास बाहेर फिरावयास घेऊन जावे एवढीच इच्छा मनात बाळगणारी ती पूर्णपणे निराश झाली. नवरा घरी आल्या-आल्या पुन्हा लॅपटॉप घेऊन बसला. तो तिच्याशी जुजबीच बोलत असे. दुसºयाच आठवड्यात मध्यरात्रीनंतर तिला नवºयाने झोपेतून उठवले. टीव्हीवर खाना-खजाना कार्यक्रम चालू होता. आपल्याकडे दुपार होती. तिकडे अमेरिकेत मध्यरात्र होऊन गेली होती. तो तिला म्हणाला, हा पदार्थ आताच्या आता मला करून दे. ती म्हणाली, आता रात्रीचे दोन वाजलेले आहेत, सकाळी हा पदार्थ तयार करून तुुम्ही आॅफिसला जाताना तुमच्या डब्यात देते. त्याचा पारा एकदम चढला. त्याने तिला थेट बेदम मारहाण केली आणि ताबडतोब ढारढूर झोपून गेला. पतीकडून अचानकपणे मारहाण झाल्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली. तिला रात्री बराचवेळ झोप आली नाही. सकाळी केव्हातरी डोळा लागला तर त्याने तिला उठवले. तिच्या पाया पडला. माफी मागितली. तिला म्हणाला, मी तुला रात्री ज्या क्रमाने (पद्धतीने) मारले, त्याच क्रमाने तू देखील मला मार. क्रम चुकला तर पुन्हा मीच तुला मारणार. ती बिचारी पार हादरुन गेली. तो तिला त्याला मारण्याबद्दल हट्टच धरुन बसला होता. तिचा नाईलाज झाला. त्याला तिने मारहाण केली, परंतु मारहाणीच्या क्रमवारीत चूक झाल्याने त्याने पुन्हा तिला मारले आणि तो आॅफिसला निघून गेला. त्या दिवशी सकाळी तिच्या आईचा तिला फोन आला. आज वटपौर्णिमा आहे. तुमच्या तेथे वडाचे झाड नसेल, तू कागदावर वडाचे चित्र काढून त्याला असाच नवरा सातजन्मी मिळावा म्हणत प्रदक्षिणा घाल.

ती बिचारी काय उत्तर देणार? जुजबी बोलून तिने फोन बंद केला. नवºयाचा विचित्रपणा, चक्रमपणा दिवसेंदिवस वाढतच होता. एकेदिवशी तर कळसच झाला. तिला नवºयाने बेदम मारहाण केली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून अमेरिकन शेजारी आले. त्या शेजाºयाने ९११ ला फोन करुन पोलिसांना बोलावले. अतिशय भयभीत झालेल्या अवस्थेत तिने पोलिसांना रडत रडत ‘आपबिती’ सांगितली. पोलिसांच्या मदतीने ती भारतात परत आली. आता पुढे काय करायचे याचा सल्ला घेण्यासाठी ती आई-वडिलांसोबत माझ्याकडे आली होती. असल्या विक्षिप्त नवºयाबरोबर आयुष्य काढणे धोक्याचे आहे. त्यामुळे घटस्फोट घेण्याचा सल्ला मी त्यांना दिला. तिची आई म्हणाली, आबासाहेब माझी अजून एक मुलगी लग्नाची आहे. हिने घटस्फोट घेतला तर त्या दुसºया मुलीला स्थळ मिळणार नाही. मी त्यांची समजूत घातली. मी म्हणालो, बाई वरती फार मोठा कॉम्प्युटर आहे. त्या कॉम्प्युटरमध्ये  परमेश्वराने प्रत्येकाची जन्म, लग्न आणि मृत्यूची तारीख फिड करुन ठेवलेली आहे. त्या त्या प्रमाणेच घडत राहते. तुमच्या मुलीचे लग्न जमवणारा वरती बसलेला आहे. तुम्ही कशाला काळजी करता ?

त्याप्रमाणे शेवटी घटस्फोटाचे प्रकरण दाखल करण्याचे ठरले. त्याला त्याबद्दल नोटीस पाठवली. गपगुमान घटस्फोट द्या, नाही तर विक्षिप्त स्वभाव माहीत असूनही मुलाचे लग्न लावून दिले. त्याबद्दल संपूर्ण घरादारावर खटला दाखल करण्याचा आणि अमेरिकेतील अत्याचाराबद्दल कंपनीला कळविण्याचा दम भरला. तो घटस्फोट देण्यास तयार झाला. यथावकाश तिला घटस्फोट मिळाला. ती पुन्हा नोकरीस लागली. कंपनीतीलच तिच्याबरोबर काम करणाºया एका सहकाºयाबरोबर तिची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमाचे रुपांतर नवरा-बायकोत झाले. करिअरमध्ये ती अत्यंत हुशार तर तो सर्वसामान्य. आता ती अत्यंत सुखात आहे. अमेरिकेतील अति हुशार पहिल्या नवºयापेक्षा हा सर्वसामान्य असलेला नवरा केंव्हाही चांगलाच.  (अति) हुशार नवरा नको गं बाई ! असेच तर ती म्हणत नसेल ना ?  - अ‍ॅड. धनंजय माने(लेखक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालय