शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मुंबईचा नव्हे... माढ्याचा डबेवाला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 17:21 IST

खडतर प्रवासाची ३२ वर्षे;  सायकलीवरून दररोज २५ किलोमीटर पायपीट

ठळक मुद्देदिलीप साळुंखे असे त्या अवलियाचे नावमाढा तालुक्यात दारफळ येथून ते सायकलीवर आपला प्रवास सुरू करतात़सोलापूर शहरात २५ किलोमीटर सायकलीवर फिरून डबे पोच करण्याचे काम करीत आहेत

अय्युब शेख 

माढा: मुंबईमध्ये बहुसंख्य नोकरदार आणि विद्यार्थ्यांना न चुकता वेळेवर डबे पोहोचवणारा डबेवाला आपण पाहिला आहात.. अशाच पद्धतीने धावपळीत डबे पोहोचवणारा माढ्यात एक डबेवाला पाहायला मिळतोय. मागील ३२ वर्षांपासून ही सेवा ईशसेवा मानून करत आहेत. खडतर प्रवासाच्या जीवनात आज मागे वळून पाहिले की, ही सेवा सार्थकी लागल्याचे त्यांना वाटते.

दिलीप साळुंखे असे त्या अवलियाचे नाव आहे. माढा तालुक्यात दारफळ येथून ते सायकलीवर आपला प्रवास सुरू करतात़ सोलापूर शहरात २५ किलोमीटर सायकलीवर फिरून डबे पोच करण्याचे काम करीत आहेत.

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी सोलापूर येथील औद्योगिक शिक्षण संस्था, इंजिनिअरिंग शिक्षणाला प्रवेश घेतात़ वसतिगृह किंवा खासगी ठिकाणी कॉटबेसिसवर खोली घेऊन राहतात़ या मुलांना घरचे जेवण पोच करण्याचे काम साळुंखे इमानेइतबारे करीत आहेत़ माढा शहर, उंदरगाव, केवड, सुलतानपूर व या परिसरातील विद्यार्थ्यांना ते सोलापूर येथे वसतिगृहात स्थायिक झालेल्या विद्यार्थ्यांना डबे पोहोचवताहेत़ या गरीब मुलांना मेसचे जेवण पचणार नाही, या भावनेपोटी पालकांनी दोन वेळचा डबा रोज सकाळी दिलीप साळुंखे यांच्या माध्यमातून द्यायला सुरुवात केली़ दररोज सकाळी हे सर्व डबे गोळा करून रेल्वे स्थानकावर पोहोचवले जातात़ येथून मेल गाडीने सोलापूरला आणून सर्व डबे सायकलीला लावून विद्यार्थ्यांच्या रूमवर पोहोचवण्याचे काम २५ किलोमीटर सायकलीवर फिरून करत आहेत.

सात रुपये अन् बिझी शेड्युल त्या वेळेस ते मासिक फक्त सात रुपये भाडे आकारून डबा पोच करत होते़ डबे झाल्यानंतर सोलापूरमधून विक्रीसाठी बटर व अंडी खरेदी करायची आणि माढ्यात रेल्वेने यायचे़ रोज दोन पोती बटर, एक हजार अंडी घेऊन यायचे आणि उंदरगाव, केवड, वाकाव, निमगाव, विठ्ठलवाडी या भागातील दुकानदारांना विक्री करायची़ अशाप्रकारचा दिनक्रम त्यांचा राहतो़ सध्या सकाळी या विद्यार्थ्यांना डबे पोच केल्यानंतर साळुंखे दयानंद महाविद्यालयामध्ये सायंकाळपर्यंत तीनशे रुपये मानधनावर माळी म्हणून काम करतात़ सायंकाळी मेल गाडीने पुन्हा माढा गाठतात़ सकाळी डबे घेऊन जातात. गेल्या ३२ वर्षांपासून साळुंखे डबे पोच करण्याचे काम करताहेत़ याव्यतरिक्त माढा शहर व परिसरातील कोणी सोलापूर शहरातील दवाखान्यात असल्यास या रुग्णांचा डबादेखील साळुंखे विनामोबदला पोच करतात़ 

मागे वळून पाहता त्यांचा ऊर भरून येतोआजपर्यंतच्या सेवाकाळात ज्या-ज्या विद्यार्थ्यांना डबे पोहोचवले त्यापैकी बहुतांश मुले आज उच्चपदस्थ नोकरीस लागले आहेत़ काही डॉक्टर झाले, काही इंजिनियर झाले, काही उद्योजक झाले़ दारफळ येथील आपल्या अत्यल्प शेतीमध्ये राबून उत्पन्न घेतात़ याशिवाय हे काम करून आपली दोन मुले, दोन मुली त्यांनाही चांगले शिक्षण दिले़ एक मुलगी इंजिनियर तर दुसरी एम़ कॉम़ शिक्षित आहे़ तसेच एक मुलगा इंजिनियर तर दुसरा वैद्यकीय अधिकारी आहे़ त्यांच्या या धावपळीच्या कार्यात पत्नीचाही हातभार असतो़ या साºया घडामोडींकडे ते कधी-कधी वळून पाहत तेव्हा त्यांचा ऊर भरून येतो़

टॅग्स :Solapurसोलापूर