शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय अस्तित्वहीन ‘उत्तर तालुक्या’चे मतदार दोन विधानसभा मतदारसंघांसाठी निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:45 IST

राजकीय; शहर उत्तरमध्ये पाच हजार; मोहोळ मतदारसंघात ५५ हजार तर सोलापूर दक्षिणमध्ये २० हजार मतदार

ठळक मुद्देउत्तर सोलापूर तालुक्यात ३६ गावे असून या गावांचे तीन विधानसभा मतदारसंघात विभाजन झालेखेड व कोंडी ही गावे शहर  उत्तर तर तिºहे पंचायत समितीमधील १० गावांचा समावेश सोलापूर दक्षिण मतदारसंघात केलाविधानसभा निवडणुकीसाठी उत्तर सोलापूर तालुक्याचे अस्तित्व राजकीयदृष्ट्या संपल्याचे दिसते

अरुण बारसकर सोलापूर : तीन विधानसभा मतदारसंघात विभाजन झाल्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्याचे अस्तित्व संपले असले तरी दोन मतदारसंघांसाठी निर्णायक मतदार आहेत. मोहोळ व सोलापूर दक्षिण मतदार विधानसभा मतदारसंघाचे निकाल उत्तर सोलापूर तालुक्यावर अवलंबून आहेत. शहर उत्तरमध्ये कोंडी व खेडच्या ५ हजार ३५४ मतदारांचा समावेश आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यात ३६ गावे असून या गावांचे तीन विधानसभा मतदारसंघात विभाजन झाले आहे. बीबीदारफळ पंचायत समिती (कोंडी वगळता), नान्नज पंचायत समिती व मार्डी (खेड वगळता) पंचायत समितीमधील २४ गावे ही मोहोळ राखीव मतदारसंघाला जोडली आहेत.

 खेड व कोंडी ही गावे शहर  उत्तर तर तिºहे पंचायत समितीमधील १० गावांचा समावेश सोलापूर दक्षिण मतदारसंघात केला                   आहे. तीन मतदारसंघात विभाजन झाल्याने उमेदवारीसाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील कोणाचा विचार होत नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर सोलापूर तालुक्याचे अस्तित्व राजकीयदृष्ट्या संपल्याचे दिसते. मात्र मतदारांची संख्या विचारात घेतली असता मोहोळ व सोलापूर दक्षिण मतदारसंघासाठी उत्तर  तालुक्याचे मतदार निर्णायक ठरणार आहेत. 

उत्तर सोलापूर तालुक्यातील ३६ गावांचे ८० हजार ८१० मतदार आहेत. यापैकी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील २४ गावांची मतदार संख्या ५५ हजार २८१ इतकी आहे. सोलापूर दक्षिण मतदारसंघाला जोडलेल्या १० गावातील मतदार २० हजार १५५ तर कोंडी व खेडची संख्या ५ हजार ३५४ इतकी आहे. तिन्ही मतदारसंघांना जोडलेल्या मतदारांची संख्या लक्षात घेतली असला उत्तर सोलापूर तालुक्याचे मतदार मतपेटीतून अस्तित्व दाखवू शकतात, असे चित्र आहे.

दिग्गज नेते; मात्र मतदारसंघ नाही..- उत्तर सोलापूर तालुक्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी आ. दिलीप माने , राष्टÑवादीकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार हे दिग्गज नेते उत्तर सोलापूर तालुक्यात आहेत. देशमुख व माने हे शहरात व सोलापूर दक्षिण मतदारसंघात राहत असल्याने त्यांना संधी मिळाली आहे. मात्र साठे व पवार यांना मतदारसंघ नसल्याने पंचायत झाली आहे. माजी पंचायत समिती उपसभापती संभाजी भडकुंबे हे २२ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य होत्या तर कन्या रजनी भडकुंबे या पंचायत समितीच्या विद्यमान उपसभापती आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकmohol-acमोहोलsolapur-city-north-acसोलापूर शहर उत्तर