शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या निवडीमागे कोणताही बोलविता धनी नाही : बंडगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 13:02 IST

मुलाखत : करमाळा बाजार समिती निवडणुकीतील राजकीय नाटयानंतर नुतन सभापती शिवाजी बंडगर यांच्याशी साधलेला संवाद

ठळक मुद्देमी आ. नारायण पाटील व जयवंतराव जगताप युतीतून विजयी झालो - शिवाजी बंडगर संधी का सोडावी म्हणून बागल गटात प्रवेश केला - शिवाजी बंडगर

करमाळा: करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जयवंतराव जगताप यांच्याऐवजी चंद्रकांत सरडे हे सभापती होत असल्याचे समजल्यानंतर ही संधी का सोडावी म्हणून बागल गटात प्रवेश केला आणि सभापती झालो. माझा बोलाविता धनी मोहिते-पाटील अथवा नारायण पाटील नसल्याचे बाजार समितीचे नूतन सभापती शिवाजी बंडगर यांनी सांगितले.

करमाळा बाजार समिती निवडणुकीत नाट्यमय घडामोडीतून बंडगर हे सभापती झाले. त्यानंतर उलटसुलट चर्चा होऊ लागली. या पार्श्वभूमीवर बंडगर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, मी आ. नारायण पाटील व जयवंतराव जगताप युतीतून विजयी झालो. माजी आ. जयवंतराव जगताप हेच सभापतीपदाचे उमेदवार ठरले होते; मात्र निवडणुकीत त्रिशंकू स्थिती झाली. जयवंतराव जगताप यांना सभापतीसाठी दोन सदस्य हवे होते. झेडपी अध्यक्ष संजय शिंदे यांच्या गटाकडे चंद्रकांत सरडे व सावंत गटाचे वालचंद रोडगे हे दोन सदस्य होते. या दोघांना सोबत घेण्यासाठी आठ दिवसात बºयाच बैठका झाल्या.

या बैठकीत सावंत गटाचे सुनील सावंत यांनी चंद्रकांत सरडे यांच्या नावाचा आग्रह धरला. अखेरच्या क्षणी जगताप हतबल झाले आणि सरडे यांच्या नावाला संमती दिली. निवडीच्या अगोदरच्या दिवशी मंगळवारी आ. नारायण पाटील यांच्याकडे गेलो. ते मुंबईला निघाले असताना जयवंतराव जगताप सभापती व चंद्रकांत सरडे उपसभापती असा अंतिम निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर हे सगळे खोटे असून चंद्रकांत सरडे हेच सभापती होणार असल्याचे ठरले आहे, असे आपण आ. पाटील यांना सांगितले.

यासाठी घेतला निर्णय- बागल गट मला सभापतीपद द्यायला तयार आहे, मात्र त्यासाठी गटात प्रवेश करण्याची अट घातली आहे, अशी माहिती आ. पाटील यांना आपण दिली. त्यावर पाटील यांनी असे करू नका, बागल गटात जाऊ नका, तसा निर्णय घेऊ नका असे सांगितले होते.  चंद्रकांत सरडे वाटाघाटी करून सभापती होत असतील तर मी गेली २५ वर्षे राजकारणात आहे. प्रपंचाची राखरांगोळी केली, ही संधी का घालवायची असा विचार केला. जगताप यांच्याऐवजी सरडे सभापती होणार असल्याने आपण बागल गटात जाण्याचा निर्णय घेतला, असे बंडगर यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर