शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

ना हॉटेल, ना पाणी; आठ हजार जड वाहने, मात्र नाही शासकीय थांबाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 12:59 IST

परप्रांतीय वाहन चालकांपुढे गैरव्यवस्थेचा प्रश्न; चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

ठळक मुद्देसोलापुरात बाजार समिती, महापालिका यांच्याकडून शासकीय हक्काचा सुरक्षित थांबा नाहीमहाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, वाशी (मुंबई) येथील बाजार समित्यांनी जड वाहनांसाठी थांबा उपलब्ध केलासोलापुरात बाळे, जुना पुणे नाका, रामवाडी गोडावून बाजूला, बोरामणी नाका, हैदराबाद रोड, जुना तुळजापूर रोड अशा आठ ठिकाणी खासगी थांबे आहेत

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि मराठवाड्याचे क्रॉसिंग सेंटर म्हणून पाहिल्या जात असलेल्या सोलापुरात जड वाहनांना कुठेही सुरक्षित शासकीय थांबा नाही़ चारही महामार्गांवर केवळ खासगी मालकी थांब्याचा आधार घेणाºया चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे येतोय़  शहर हद्दीत नाक्यांवर जवळपास आठ हजार जड वाहने थांबून असतात़ खासगी मालकीच्या थांब्याकडून केवळ शुल्क वसूल होते़ टोल स्वरुपातून वा अन्य कररुपाने सोलापुरात महिन्याकाठी कोट्यवधींचा कर वसूल होतो़ मात्र कसलीच सुविधा नसल्याची खंत वाहतूकदारांमधून व्यक्त होत आहे.

सोलापुरात बाजार समिती, महापालिका यांच्याकडून शासकीय हक्काचा सुरक्षित थांबा नाही़ महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, वाशी (मुंबई) येथील बाजार समित्यांनी जड वाहनांसाठी थांबा उपलब्ध केला आहे़ सोलापुरात बाळे, जुना पुणे नाका, रामवाडी गोडावून बाजूला, बोरामणी नाका, हैदराबाद रोड, जुना तुळजापूर रोड अशा आठ ठिकाणी खासगी थांबे आहेत़ यांच्याकडून २४ तासांसाठी २०० रुपये शुल्क आकारतात़ या बदल्यात थांब्याशिवाय ना टॉयलेट, ना आंघोळ, ना हॉटेल, ना दवाखान्याची व्यवस्था आहे़ या वाहनांना लागणारी पंक्चर दुकाने, हवा सेंटर नाही़ अतिशय गैरव्यवस्थेत हे लोक सोलापुरात २४ तासांसाठी थांबतात.

शहर हद्दीत वा बाहेर कुठेही शासनाचा अधिकृत थांबा नसल्याने बरीच जड वाहने ही नाक्याबाहेरील पेट्रोल पंपावर इंधन भरुन बाजूच्या मोकळ्या जागेत रात्री थांबतात़ सकाळी येथून निघताना पेट्रोल पंपाचे सुरक्षारक्षकदेखील ‘खुशी’ मागितल्याशिवाय सोडत नाही़ 

राष्ट्रीय महामार्ग म्हणते, थांबे आहेत...याबाबत राष्ट्रीय राजमार्गचे प्रबंधक संजय कदम यांच्याशी संवाद साधला असता आम्ही केवळ टोल वसूल करत नाही़ वाहतूक आणि वाहनांच्या सुरक्षेचाही विचार करतो म्हणाले़ राष्ट्रीय महामार्गाने उभारलेले छोट थांबे हे फार कोणाच्या लक्षात येत नाहीत़ भीमानगर, तुळजापूरजवळ, सोलापूर-पुणे महामार्गावर निसर्ग ढाब्याजवळ दहा ट्रका उभारतील एवढी जागा दिली आहे़ भविष्यात या जड वाहतूकदारांसाठी हॉटेल, स्वच्छतागृह उपलब्ध करुन देण्याचा प्लॅन आहे असल्याचे ते म्हणाले़

नलिनी चंदेले या महापौर म्हणून निवडून येताच मोटार मालक संघटनेने जड वाहनांच्या थांब्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती़ त्यानंतर याच शिष्टमंडळाने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली होती़ त्यांनी जय भवानी हायस्कूल परिसरातील जवळपास दहा हजार स्क्वेअर फूट मोकळी जागा सुचवून देण्याचे आश्वासन दिले होते़ पुढे काहीच झाले नाही़- उदयशंकर चाकोते, अध्यक्ष, मोटार मालक संघटना 

बाजार समितीची परिस्थिती चांगली आहे़ पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे़ मध्यंतरी या जड वाहनांना थांबा देण्यासाठी बोरामणी रोडवर काही जागा पाहणी केली होती़ मात्र  दराच्या प्रश्नावरून हा विषय जरा बाजूला पडला आहे़ याबाबत सभेत चर्चाही झाली आहे़ पुन्हा एकदा पाठपुरावा करतोय़ सध्या अडचणीच्या प्रसंगी बाजार समितीसमोरील जनावर बाजारात तात्पुरता थांबा देतोय़ - विजयकुमार देशमुख, अध्यक्ष बाजार समिती

टॅग्स :Solapurसोलापूरroad transportरस्ते वाहतूकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीhotelहॉटेलWaterपाणी