शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहरातील तीन हजार घरांना नाही ड्रेनेज जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:49 IST

विजापूर रोड, जुळे सोलापूर, मजरेवाडी, कुमठे परिसरासाठी राबविण्यात आलेल्या ड्रेनेज योजनेचे काम पूर्णत्वावर आहे. 

ठळक मुद्देरेल्वे लाईन पार करण्यासाठी मनपाने ड्रेनेज लाईनचे पैसे रेल्वेकडे भरले आहेत रेल्वेमुळे ड्रेनेजलाईन जोडणीचे काम पूर्ण न झाल्याने ही समस्या

सोलापूर : रेल्वे रुळाखालून ड्रेनेजलाईन पार केली नसल्याने मजरेवाडी व कुमठे परिसरातील अद्याप तीन हजार घरांना ड्रेनेज जोडणी रखडली आहे. 

विजापूर रोड, जुळे सोलापूर, मजरेवाडी, कुमठे परिसरासाठी राबविण्यात आलेल्या ड्रेनेज योजनेचे काम पूर्णत्वावर आहे. कुमठे मलनिस्सारण केंद्राला होटगी रोड परिसरातील जोडणारी लाईनची अद्याप जोडणी न झाल्याने या परिसरातील मिळकतींना ड्रेनेज जोडणी मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे.

रेल्वे लाईन पार करण्यासाठी मनपाने ड्रेनेज लाईनचे पैसे रेल्वेकडे भरले आहेत. हे काम मार्गी लागावे म्हणून पाठपुरावा सुरू आहे. पण काम पूर्ण होण्यास विलंब झाल्याने याचा फटका ड्रेनेज जोडणीला बसला आहे. रेल्वेमुळे ड्रेनेजलाईन जोडणीचे काम पूर्ण न झाल्याने ही समस्या निर्माण झाली तरी मिळकतींना प्रॉपर्टी चेंबर बांधण्याचे काम ठेकेदाराने पूर्ण करण्याचे अपेक्षित होते. पण हे काम अद्याप झाले नसल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान ठेकेदाराने काम पूर्ण झाल्याचा अभिप्राय आयुक्तांकडे दिला आहे. आयुक्त व थर्ड पार्टी आॅडिट झाल्यानंतर मनपा हे काम हस्तांतरित करून घेणार आहे. प्रस्तावात दिलेल्याप्रमाणे काम झाले की नाही याची प्रत्यक्षात पाहणी करण्यात येणार आहे. ड्रेनेजसाठी खोदण्यात आलेले जुळे सोलापुरातील अनेक रस्ते दुरूस्त करण्यात आले नाहीत अशा तक्रारी आहेत. याची प्रत्यक्षपणे तपासणी करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी प्रॉपर्टी जोडणीसाठी खोदलेले खड्डे तसेच ठेवण्यात आले आहेत तर काही ठिकाणी सिमेंटने तर काही ठिकाणी प्रिमिक्सने खड्डे भरण्यात आले आहेत़ अनेक ठिकाणी चक्क मुरूम भरून मलमपट्टी करण्यात आली आहे. ज्या भागात काम पूर्ण झाले आहे अशा ठिकाणी ड्रेनेज जोडणीला परवानगी देण्यात आली आहे. यासाठी फक्त ५00 रुपये डिपॉझिट व अंतराप्रमाणे जोडणी शुल्क आकारण्यात येत आहे. 

ठेकेदाराने प्रस्तावाप्रमाणे काम पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. कामाची तपासणी करण्यात येईल. त्यानंतरच ठेकेदाराचे उर्वरित बिल अदा केले जाणार आहे. ज्या ठिकाणचे काम अद्याप पूर्ण व्हायचे राहिले आहे, ते करून घेतले जाईल. तसेच खड्ड्यांची पाहणी करून दुरूस्ती केली जाईल.- डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका