शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

बालकामगार नाहीत, केवळ सूचना फलकांवर; अप्रत्यक्ष साफसफाईसाठी असतात कामावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 16:13 IST

१९ मालकांवर कारवाई : हजारो मुलांचा शोध घेऊन आणले शिक्षणाच्या प्रवाहात

संताजी शिंदे

सोलापूर : शहरातील हॉटेल, बांधकाम क्षेत्र आणि कारखान्यात बालकामगार ठेवले जात नाही, असे बोर्ड लावण्यात आले आहेत. असे असले तरी बहुतांश ठिकाणी कुठे साफसफाईसाठी तर कुठे बांधकाम मजूर म्हणून बालकामगार काम करत असल्याचे दिसून येते. ‘ऑपरेशन मुस्कान २०२१’ या मोहिमेंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्यावतीने १९ मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घरची अर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने व कुटुंबाला हातभार लावण्यासाठी लहानवयातच मुलांना कामाला पाठविले जाते. मुलांना कामाला पाठवल्याने त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास होत नाही शिवाय काही ठिकाणी धोकादायक स्थितीमध्ये काम करावे लागते. त्यामध्ये लहान मुलांच जीव जाण्याची शक्यता असते. आर्थिक उत्पन्नासाठी लहान मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हा बालकामगार प्रतिबंधक कायदा १९८६ नुसार गुन्हा आहे.

वय वर्षे १४ खालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करणे, हे या अधिनियमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बालकामगारांना पकडून बालकल्याण समितीसमोर हजर केले जाते. समिती बालकामगारांची चौकशी करून त्यांना शाळेत पाठवण्याच्या अटीवर पालकांच्या ताब्यात देतात.

बालकामगार प्रतिबंधक अधिनियम काय सांगतो

  • ० ते १४ वर्षांखालील कोणत्याही मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये व हानीकारक प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास प्रतिबंध करतो. त्याचप्रमाणे तो, मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यास हानिकारक मानले गेलेले १६ व्यवसाय व धोकादायक समजल्या गेलेल्या ६५ प्रक्रियांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास मनाई करतो.
  • ० नियमभंग करणाऱ्यांना ३ महिन्यांपासून ते १ वर्षापर्यंत तुरुंगवास, व त्यासोबत १० ते २० हजार रुपये दंड होऊ शकतो. १४ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करणे, हे या अधिनियमांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विशेषतः, १४ वर्षांखालील कोणत्याही मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये व हानीकारक प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास प्रतिबंध करतो.
  • ० दोषींवर कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या किंवा तुरुंगवासाच्या शिक्षा देण्याच्या तरतुदीही त्यामध्ये आहेत. मात्र, या अधिनियमाच्या कक्षेमधून कुटुंबे व प्रशिक्षण संस्थांना वगळण्यात आलेले आहे.
  •  

‘येथे बालकामगार काम करीत नाहीत...’पाटी केवळ नावालाच

पूर्वभाग

  • ० पूर्वभागात अनेक कारखाने आहेत, त्या ठिकाणी चादर कारखाने, टॉवेल कारखाने व गारमेंटमध्ये बालकामगार ठेवल्याचे यापूर्वी निदर्शनास आले आहे.
  • ० शहरातील मध्यवर्ती भागात व हद्दवाढीमध्ये अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी बांधकामांवर अनेक बालकामगार आढळून आले आहेत.

सैफूल

  • ० सैफूल-विजापूर रोडवर रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल्समध्येही ‘ऑपरेशन मुस्कान २०२१’ अंतर्गत सर्व्हे करण्यात आला. काही हॉटेल मालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
  • ० शहरातील फौजदार चावडी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉटेल, बांधकाम व चहा कॅन्टीन आदी ठिकाणी बालकामगार आढळून आले आहेत. संबंधित मालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
  • ० भवानी पेठेत करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये अनेक ठिकाणी बालकामगार आढळून आले आहेत. मुलांना ताब्यात घेऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

गेल्या दोन वर्षांत ‘ऑपरेशन मुस्कान’अंतर्गत बालकामगार ठेवल्याप्रकरणी मालकांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त बापू बांगर, पोलीस निरीक्षक बजरंग साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोहीम यशस्विपणे राबविली आहे. बालकामगारांना मुख्य प्रवाहात आणणे हा आमचा एकमेव उद्देश आहे.

- प्रशांत क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष.

 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसhotelहॉटेल